42 corona positive patients 15 hours in Solapur
42 corona positive patients 15 hours in Solapur 
सोलापूर

सोलापुरात पंधरा तासात 42 कोरोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, एकूण बाधित 709

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  बुधवारी सायंकाळी 5 आज गुरुवारी सकाळी 8 या 15 तासांमध्ये तब्बल 42 नवीन रुग्ण आढळले आहेत. या नवीन  रुग्णांमध्ये  17 पुरुष व 25 महिलांचा समावेश आहे. एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यूही आज सकाळी आठ वाजेपर्यंत झाला आहे.

कोरोनामुळे सोलापुरातील मृत पावलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 67 झाली आहे. सोलापुरातील सहा हजार 289 जणांची  आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 5,580 आले आहेत. 709 पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या 311 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या कधी आटोक्यात येणार? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे. 12 एप्रिल पर्यंत कोरोना मुक्त असलेले सोलापूर अचानक कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलिस विभाग सोलापुरातील कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. दैनंदिन वाढत चाललेल्या रुग्णसंख्या संख्येमुळे सोलापूरमध्ये संभ्रमाचे व भितीचे वातावरण पसरले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT