Textile2 
सोलापूर

लॉकडाउनमध्ये "चिंचोळी'त 50 टक्के तर "या' एमआयडीसीत नगण्य उद्योग सुरू; टेक्‍स्टाईलची उलाढाल ठप्प !  काय आहे कारण? वाचा...

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोनाची विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 22 मार्चपासून लॉकडाउन करण्यात आला होता. सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाउननंतर 7 जूनपासून लॉकडाउन शिथिलीकरणामुळे येथील उद्योग-व्यवसाय सुरू झाले. मात्र मागणी नसल्यामुळे येथील यंत्रमाग उद्योगात 40 टक्‍के उत्पादने सुरू झाली. गारमेंट व विडी उद्योगही सुरू झाला होता. मात्र पुन्हा एकदा दहा दिवासांच्या लॉकडाउनमुळे शहरातील उद्योगधंद्यांवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. तरीही शहराबाहेरील चिंचोळी एमआयडीसीत जवळपास 50 टक्के उद्योग सुरू असून, त्या मानाने अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे नगण्य उद्योग सुरू आहेत. 

सध्या शहरात शुक्रवारपासून दहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योगांवर परिणाम होऊ नये उद्योगांना या कालावधीत उद्योग सुरू करण्यासंदर्भात सशर्त परवानगी दिली होती. यात उद्योजकांनी कामगारांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. त्यांना कारखाना ते घर ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय करावी अथवा कामगारांना कारखानास्थळी लॉकइन करावे. या अटी व शर्थींमुळे शहरातील उद्योजकांनी उद्योग बंद ठेवणेच पसंत केले. अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील जवळपास 600 प्लॉटवरील एकूण 450 उद्योगांपैकी 300 यंत्रमाग उद्योग आहेत. यापैकी महापालिका प्रशासनाच्या नियमानुसार फक्त 35 ते 40 यंत्रमाग उद्योग सुरू आहेत, तेही चार ते पाच तास. इतर वेळी साडेचार कोटींची उलाढाल असणाऱ्या उद्योगात 7 जूनपासून दोन कोटींची उलाढाल होत होती. आता होणाऱ्या उत्पादनांचा अंदाजही घेता येईना इतकी उलाढाल कमी आहे. उर्वरित फार्मास्युटिकल, गारमेंट, फौंड्री, फरशी कारखाने असून त्यापैकी बोटावर मोजण्याइतकेच उद्योग सुरू आहेत. एकूणच या परिसरात नगण्य उद्योग सुरू आहेत. 

चिंचोळी एमआयडीसी येथे जवळपास 300 उद्योग असून, या लॉकडाउनच्या काळात तेथे जवळपास 150 हून जास्त उद्योग सुरू आहेत. येथील महत्त्वाचे फार्मास्युटिकल, केमिकल्स, यंत्रमाग व इंजिनिअरिंग वर्क्‍सचे कारखाने सुरू असून, एक्‍स्पोर्टची कामे असल्याने ठरलेल्या वेळेत उत्पादने द्यावी लागत असल्याने या कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करून उद्योग सुरू ठेवले आहेत. 

ठळक मुद्दे 

  • चिंचोळी एमआयडीसी येथे जवळपास 300 उद्योग 
  • लॉकडाउनमध्ये छोटे-मोठे 150 हून अधिक उद्योग सुरू 
  • यात मोठे कारखाने फार्मास्युटिकल, केमिकल्स, यंत्रमाग व इंजिनिअरिंग वर्क्‍स यांचा समावेश 
  • अक्‍लकोट रोड येथील 600 प्लॉटवर एकूण 450 उद्योग 
  • लॉकडाउनमध्ये नगण्य प्रमाणात यंत्रमाग उद्योग सुरू असून फार्मास्युटिकल, केमिकल, इंजिनिअरिंग वर्क्‍स आहेत सुरू 

चिंचोळी एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष केशव रेड्डी म्हणाले, चिंचोळी एमआयडीसी येथे जवळपास 300 च्या आसपास छोटे-मोठ उद्योग आहेत. सध्याच्या लॉकडाउनमध्ये एक्‍स्पोर्टचे ऑर्डर्स वेळेत पूर्ण करण्यासाठी 150 हून अधिक कारखाने सुरू असून, त्यांच्याकडून कामगारांची ने-आण, सुरक्षेसाठी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. 

जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम म्हणाले, अक्कलकोट रोड एमआयडीसी जवळपास 600 प्लॉटवर 450 उद्योग असून, त्यातही 300 यंत्रमाग उद्योग आहेत. उर्वरित गारमेंट, फार्मास्युटिकल, केमिकल, इंजिनिअरिंग वर्क्‍स आदी उद्योग आहेत. सध्या एक्‍स्पोर्ट ऑर्डर पूर्ण करण्यासाठी 35 ते 40 यंत्रमाग उद्योग सुरू आहेत. त्यांच्याकडूनही उत्पादने 40 टक्‍क्‍यांच्या आसपास सुरू आहेत. कारण, कामगार स्वत: कामावर येण्यास तयार नाहीत. तर काही कारखानदारांकडे कामगारांना ने-आण करणे परवडत नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अश्लील व्हिडिओ बघत आहे म्हणून CBI ने पाठवला मेल; ओपन करताच दिसलं असं...नेमकी भानगड काय?

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

SCROLL FOR NEXT