Subsidy for Drip Irrigation ESAKAL
सोलापूर

ठिबकसाठी आता 80 टक्‍के सबसिडी! 13 दिवसांत मिळणार अनुदान

पाण्याची खालावलेली पातळी, उत्पादकता वाढीसाठी पाण्याचे नियोजन, पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची घटलेली उत्पादकता, यावर आता ठिबक सिंचनाचा पर्याय शाश्‍वत ठरू लागला आहे. दरवर्षी 15 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याच्या मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेतून 80 टक्‍के अनुदान दिले जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पाण्याची खालावलेली पातळी, उत्पादकता वाढीसाठी पाण्याचे नियोजन, पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीची घटलेली उत्पादकता, यावर आता ठिबक सिंचनाचा पर्याय शाश्‍वत ठरू लागला आहे. दरवर्षी 15 हजार शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व राज्याच्या मुख्यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेतून 80 टक्‍के अनुदान दिले जात आहे.

काही तालुक्‍यांमध्ये दोन हजार फुटांपर्यंत बोअर घेऊनही पाणी हाती लागत नाही. पावसाच्या अनियमिततेमुळे पाण्याची पातळी खालावू लागली आहे. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसह सर्वांनाच पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ठिबक अनुदानाच्या योजना आणल्या आहेत. महाडीबीटीच्या माध्यमातून कोणताही शेतकरी घरबसल्या त्यासाठी अर्ज करु शकतो. ठिबक बसविल्याची पडताळणी झाल्यानंतर त्याचा अनुदानाचा अर्ज मंजूर होतो. त्यांना काही दिवसांत अनुदान वितरीत केले जाते. करमाळ्यातील काही शेतकऱ्यांना अवघ्या 13 दिवसांत अनुदान मिळाले आहे. ठिबक सिंचनाखालील क्षेत्र वाढावे, पाण्याचा अपव्यय टाळता यावा, जमिनीची सुपिकता कायम टिकून राहावी, या हेतूने ठिबकचे अनुदान आता 80 टक्‍के करण्यात आले आहे. त्यासाठी पाच (12.5 एकर) हेक्‍टरपर्यंत क्षेत्राची मर्यादा आहे. अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून 45 टक्‍के तर लहान शेतकऱ्यांना 55 टक्‍के आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेतून मोठ्या शेतकऱ्याला 35 टक्‍के तर लहान शेतकऱ्यांना 35 टक्‍के अनुदान मिळते. 2021-22 मध्ये अर्ज केलेल्या 18 हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास साडेआठ हजार शेतकऱ्यांना 22 कोटींचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. आता चालू वर्षात जिल्ह्यासाठी 70 कोटींचे अनुदान लागेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

कमी पाण्यात अधिक उत्पादन घेणे शक्‍य आहे, हे ठिबक सिंचनामुळे सिध्द झाले. पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत घसरू लागला असून उत्पादकताही कमी झाली आहे. शेतकऱ्यांनी केवळ अनुदान मिळविण्यासाठी ठिबक न बसविता, 'जल है तो कल है' या प्रमाणे प्रत्येकांनी भविष्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

जिल्ह्यातील 'ठिबक'ची स्थिती...
लागवडी योग्य क्षेत्र
11.34 लाख हेक्‍टर
ठिबक सिंचनाखालील क्षेत्र
2.35 लाख हेक्‍टर
दरवर्षीचे शेतकरी लाभार्थी
15,000
ठिबकची सबसिडी
80 टक्‍के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs ELSS vs NPS: 5,000 रुपयांची दरमहा गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त परतावा? 15 वर्षांत किती तयार होईल फंड

Ankshastra : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात प्रचंड कृतघ्न; चांगुलपणाची कधीच करत नाहीत परतफेड, मित्र म्हणून मदत करण्यापूर्वी नक्की करा विचार

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MPSC Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाची जिद्दीची कमाल; तांड्यावरून न्यायालयापर्यंतचा प्रवास, ज्ञानेश्वर चव्हाण झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT