31sugar_factory_4.jpg 
सोलापूर

सकाळ ब्रेकिंग ! गोदामांत सडतेय 90 लाख टन साखर 

तात्या लांडगे

सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग 2014-15 पासून अडचणीतून बाहेर पडलेला नाही. सद्यस्थितीत राज्यात तब्बल 90 लाख टन साखर कारखान्यांच्या गोदामांमध्ये पडून असून देशाअंतर्गत विक्री आता कोरोनाच्या लॉकडाउनमुळे घटली असून 20 मार्चपासून निर्यातही बंद झाली आहे. निर्यातीसाठी निघालेली दोन लाख टन साखर कोरोनामुळे बंदरांमध्ये अडकून पडली असून शिल्लक साखरेमुळे कारखानदारांसमोर अडचणीचा डोंगर उभा राहिला आहे. 


महाराष्ट्रातील साखर इराण, इंडोनेशिया, चीन, सौदी अरेबिया, दुबईसह मध्य पूर्व आशिया देशांमध्ये निर्यात केली जाते. 2017-18 मध्ये राज्यातून 13 लाख टन तर 2018-19 मध्ये 16 लाख टन साखरेची निर्यात झाली होती. 2019-20 मध्ये 20 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे केंद्र सरकारने दिले होते, परंतु आतापर्यंत त्यातील सात लाख टन साखर निर्यात झाली आहे. 1 ऑक्‍टोबरपर्यंत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान असून देशाअंतर्गत साखर दरमहा सात लाख टनांपर्यंत विक्री होणे अपेक्षित असतानाही कोरोनामुळे विक्रीत घट झाली आहे. आता स्पटेंबर 2020 पर्यंत सुमारे 30 लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्टे असल्याची माहिती उपपदार्थ विभागाचे सहसंचालक डॉ. संजयकुमार भोसले यांनी दिली. दरम्यान, मागील तीन वर्षांपासून राज्यातील साखरेचे उत्पादन खपापेक्षा अधिक होऊ लागले असून दरवर्षी 25 ते 35 लाख टन इतकी साखर शिल्लक राहत असल्याचेही ते म्हणाले. आता यंदा तब्बल 50 लाख टन साखर शिल्लक राहणार असून आगामी साखर हंगामात साखरेचे उत्पादनही वाढणार असल्याने कारखानदारांची मोठी पंचाईत होणार आहे. 

साखर विक्रीचे मोठे संकट 
राज्यात सद्यस्थितीत 90 लाख टन साखर शिल्लक असून लॉकडाउनंतर निर्यात बंद आहे. 2019-20 मध्ये 20 लाख टन साखर निर्यातीचे उद्दिष्टे होते, परंतु त्यापैकी 13 लाख टन साखर निर्यात झालेली नाही. निर्यात बंद आणि साखरेची मागणी घटल्याने कारखानदारांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. 
- डॉ. संजयकुमार भोसले, सहसंचालक, उपपदार्थ, साखर आयुक्‍तालय 


साखर साठ्याची स्थिती 
शिल्लक साखर 
90.28 लाख टन 
निर्यात करावयाची साखर 
13 लाख टन 
सप्टेंबरपर्यंत देशाअंतर्गत विक्रीचे नियोजन 
30 लाख टन 
विक्रीनंतरही शिल्लक राहणारा साठा 
50 लाख टन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : तुमचं नाव यादीत आहे का? अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची नवी यादी जाहीर; साताऱ्यातील 5 हजार 578 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

मैत्रिणीने फसवलं, ३ नराधमांनी दारू पाजून १७ वर्षीय मुलीवर रात्रभर केले अत्याचार; बेशुद्ध झाल्यावर...; मुंबईतील धक्कादायक घटना

Supreme Court : रक्ताच्या नात्यातील विवाहांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे मागितला खुलासा

Latest Marathi News Live Update : पाटण तालुक्यातील तारळे धरणावरील आदानी प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ? पेन्शनही वाढणार? 6% इन्क्रिमेंट अन् DA बाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT