शोध मोहिमेत सापडला पंढरपूर तालुक्‍यात बोगस डॉक्‍टर ! गुन्हा दाखल Canva
सोलापूर

शोध मोहिमेत सापडला पंढरपूर तालुक्‍यात बोगस डॉक्‍टर! गुन्हा दाखल

शोध मोहिमेत सापडला पंढरपूर तालुक्‍यात बोगस डॉक्‍टर ! गुन्हा दाखल

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता पंढरपूर तालुक्‍यातील तुंगत या गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्‍टरवर कारवाई करण्यात आली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : कोणतीही पदवी अथवा वैद्यकीय शिक्षण न घेता पंढरपूर तालुक्‍यातील (Pandharpur Taluka) तुंगत या गावामध्ये वैद्यकीय व्यवसाय (Medical Profession) करणाऱ्या बोगस डॉक्‍टरवर (Doctor) कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले (Dr. Eknath Bodhale) यांनी दिली आहे. जिल्ह्यात अधिकृत वैद्यकीय परवान्याशिवाय उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टरांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी दिले आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी यांची समिती असून, या समितीकडून बोगस डॉक्‍टरांची शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेत तालुक्‍यातील तुंगत गावामध्ये एसटी बस स्टॉपजवळ पत्र्याच्या खोलीत रॉय बिवास बिरेन (वय 38, रा. घाट पातली, ता. वनगाव, जि. चोवीस परगाना, पश्‍चिम बंगाल) हा बोगस डॉक्‍टर वैद्यकीय व्यवसाय करताना आढळून आला. समितीकडून दवाखान्याची तपासणी केली असता मिळालेल्या औषध व बिलांनुसार तो ऍलोपॅथीचा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले. रॉय बिवास बिरेन याच्याकडे शैक्षणिक पात्रता व वैद्यकीय नोंदणीकृत प्रमाणपत्र नसल्यामुळे मेडिकल प्रॅक्‍टिशनर ऍक्‍ट 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती डॉ. बोधले यांनी दिली.

वैद्यकीय शिक्षण नसल्याने बोगस डॉक्‍टरांकडून रुग्णांना हानीकारक औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. सामान्य नागरिकांना बोगस डॉक्‍टर कसा ओळखावा, याचे पुरेसे ज्ञान नसल्याने बोगस डॉक्‍टरकडून होणाऱ्या लुटीला त्यांना बळी पडावे लागते. याबाबत रुग्णांनी संबंधित डॉक्‍टरांच्या पदवीची माहिती घ्यावी. त्याबाबत काही शंका आल्यास तत्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे.

यासंदर्भात तहसीलदार सुशील बेल्हेकर म्हणाले, तालुक्‍यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्गाबरोबरच, डेंग्यू, चिकुन गुनियासारख्या आजारांच्या नियंत्रणासाठी प्रशासन व आरोग्य विभागाकडून आवश्‍यक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातच बोगस वैद्यकीय व्यवसाय चालवणाऱ्यांकडून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे तालुक्‍यातील सरकारी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालयाच्या दर्शनी भागावर बोगस डॉक्‍टरांविषयी तक्रार कोणाकडे करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्याचे नाव, पद व दूरध्वनी क्रमांकाचा फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाटलाग करताना थरारक Video

Chakan Update : पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार; चाकणमध्ये पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांचा इशारा

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात; ‘कोठडीतील मृत्यूच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांसाठी शपथपत्र दाखल करा’

सर्जरी अर्धवट सोडली अन् नर्ससोबत संबंध ठेवण्यासाठी गेला पाकिस्तानी डॉक्टर, दुसऱ्या नर्सनं आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT