Leopards have been found again in the Chandbibi Mahal area
Leopards have been found again in the Chandbibi Mahal area 
सोलापूर

अनगर परिसरात पुन्हा बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन ! भीतीचे वातावरण

भीमाशंकर राशीनकर

ट्रॅक्‍टरने शेत नांगरणाऱ्या बंडू पाचपुंड या ट्रॅक्‍टर चालकाला शेत नांगरताना बिबट्यासदृश प्राणी ट्रॅक्‍टरच्या उजेडात नजरेस पडला.

अनगर (सोलापूर) : येथील रेल्वेच्या 45 क्रमांकाच्या गेटसमोर व पाचपुंड वस्तीजवळ असलेल्या उत्तम ढेरे या शेतकऱ्याच्या ट्रॅक्‍टरने शेत नांगरणाऱ्या बंडू पाचपुंड या ट्रॅक्‍टर चालकाला शेत नांगरताना बिबट्यासदृश (Leopard) प्राणी ट्रॅक्‍टरच्या उजेडात नजरेस पडला. त्याने घाबरून आपल्या वस्तीवर जाऊन सर्वांना याची कल्पना दिली व व्हॉट्‌सऍप ग्रुपवर मेसेज पाठवला. त्यामुळे वस्तीवरील नागरिकांनी भीतीने रात्र जागून काढली. (A leopard-like creature was found in the Anagar area)

हा बिबट्यासदृश प्राणी सोमवारी (ता. 31) रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान बंड पाचपुंड यांना दिसला होता. दरम्यान, पंचायत समिती सदस्य अजिंक्‍यराणा पाटील (Ajinkyarana Patil) यांना ही घटना समजताच त्यांनी तत्काळ मोहोळच्या वनरक्षकांना पाचारण केले. वनरक्षकांनी परिसराला रात्रीच भेट देऊन सर्व शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. मंगळवारी (ता. 1) दुपारी त्यांनी पुन्हा भेट देऊन ठशांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र नांगरणीमुळे आणि रानामध्ये ओल नसल्याने बिबट्याचे ठसे आढळून आले नसल्याचे सांगितले.

वनविभागाने उपस्थित व शेजारील वस्तीवरील सर्व शेतकऱ्यांना त्यांनी स्वतःबरोबरच जनावरांची काळजी घेण्याचे व रात्रीच्या वेळेस एकटे घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. सागर जवळगी, सुनील साळुंखे, सुरेश कुर्ले, बापू वाघमोडे या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसर पिंजून काढला. या वेळी बंडू पाचपुंड, सुनील पाचपुंड, अशोक चोपडे, दीपक चोपडे, सचिन पाचपुंड, शाहू पाचपुंड आदी शेतकरी उपस्थित होते.

या भागात सर्वत्र ऊस शेती असल्याने मागील पाच माहिन्यांपूर्वीही महिलेला बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. पण आजपर्यंत कोणालाही कसलाही धोका झाला नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. आता पुन्हा बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT