Prime_Minister_Avas_Scheme
Prime_Minister_Avas_Scheme 
सोलापूर

खुषखबर ! घरकुलाकरिता आधार नोंदणीस "या' तारखेपर्यंत मिळाली मुदतवाढ 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना महामारीच्या संकटात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केलेल्या तालुक्‍यातील 15 हजार कुटुंबांतील 20 सदस्यांच्या आधार सीडिंगचे काम करण्याचे आव्हान ग्रामपंचायतीच्या डाटा एंट्री ऑपरेटरसमोर होते. याबाबत "ई-सकाळ'च्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर आता घरकुलासाठी आधार नोंदणीसाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 

2011-12 मध्ये करण्यात आलेल्या आर्थिक व सामाजिक जातीनिहाय सर्वेक्षणाच्या आधारावर प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी निश्‍चित करण्यात आले. यामध्ये बहुतांश लाभार्थी हे नियम व जाचक अटींमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याने शासनाने वंचित कुटुंबांना "ड' नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार तालुक्‍यातील जवळपास 80 ग्रामपंचायतींमधून 15 हजार 159 इतके अर्ज दाखल करण्यात आले होते. याबाबतही ग्रामीण जनतेला प्रशासनाने माहिती दिली नसल्याचे सांगत, पक्षनेते नितीन पाटील यांनी अर्जासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर जवळपास एक हजारपेक्षा अधिक अर्ज दाखल करण्यात आले. परंतु या सर्व अर्जांवर प्रशासकीय पातळीवर मुहूर्त मिळत नसल्यामुळे "सकाळ'ने आवाज उठवल्यानंतर सर्वेक्षण करण्यात आले. परंतु आता सर्वेक्षण केलेल्या कुटुंब प्रमुखांबरोबर कुटुंबात असलेल्या इतर सदस्यांची आधार नोंदणी "आवास प्लस' या संकेतस्थळावर करताना कमी कालावधीत सर्वच कुटुंबीयांचा समावेश करताना अडचणीचे ठरत होते. तालुक्‍यातील 15 हजार 159 पैकी 14 हजार 465 नोंदणी झाली तर जवळपास 20 हजार 141 सदस्यांची नोंदणी 31 जुलैअखेर करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या डाटा एंट्री ऑपरेटरवर होती. आता वाढीव मुदतीमुळे सर्वच कुटुंबीयांचा समावेश करणे शक्‍य होणार आहे. 

याबाबत सभापती प्रेरणा मासाळ म्हणाल्या, आवास प्लस या संकेतस्थळावर वेळेत माहिती देण्यासाठी जनतेने तत्काळ आधार ग्रामपंचायतीत जमा करावेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यासाठी शासनाने 31 ऑगस्टपर्यत मुदतवाढ दिली आहे. भविष्यात घरकुलापासून लाभार्थी वंचित राहू नये यासाठी ग्रामस्थांनी देखील सतर्क राहून नोंदणी करून घ्यावी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT