सोलापूर

सोलापुरात गणेश मूर्तींच्या रंगकामाला वेग 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : लॉकडाउन शिथिलीकरणामुळे येथील गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला असून शुक्रवारपासून गोदामातील घरगुती छोट्या मूर्तींच्या रंगकामाला युद्धपातळीवर सुरवात झाली आहे. जुलै महिनाअखेरपर्यंत या मूर्ती तयार करून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा व कर्नाटकला रवाना करण्यात येणार आहेत. 

श्री गणेश चतुर्थी 22 ऑगस्टला आहे. गेल्या दिवाळीनंतर मूर्तिकारांनी दरवर्षीच्या मागणीप्रमाणे मूर्ती तयार करण्याच्या कामास संथगतीने सुरवात केली. मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत अनेक लहान घरगुती मूर्ती साच्यातून काढण्यात आल्या. एप्रिल महिन्यापासून रंगकामास सुरवात होणार तोच 22 मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्याने सर्वच काम ठप्प झाले होते.

आता शुक्रवारपासून लॉकडाउन शिथिल झाल्याने मूर्तिकारांना सकाळी नऊ ते दुपारी पाचपर्यंत वेळ मिळाला आहे. मात्र ही वेळ अपुरी असून, वेळ वाढवून देण्याची मागणी मूर्तिकारांनी "सकाळ'शी बोलताना केली. 


सहा इंची ते तीन फुटी मूर्तींवर भर 
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा मोठ्या गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे मोठ्या मूर्तींना अद्यापपर्यंत मागणी नसल्याने मूर्तिकारांनी घरगुतीसाठी सहा इंची ते तीन फुटांच्या मूर्ती तयार करण्यावर भर दिला आहे. 

कोरोनामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात मूर्ती बनवण्यासाठी वेळ अपुरी आहे. 40 हजार लहान मूर्तींचे लक्ष्य होते मात्र आता 30 हजारांपर्यंतच मूर्ती तयार होतील असे वाटते. प्रशासनाने मूर्तिकारांना वेळ वाढवून द्यावी, जेणेकरून वेळेत सर्व ऑर्डरी पूर्ण करता येतील. 
- नरेश दुंपेटी, मूर्तिकार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्यांच्या ठसक्याने रंगायचा लावणीचा फड! त्या शकुंतलाताई नगरकर काळाच्या पडद्याआड, कलाविश्वावर शोककळा

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

SCROLL FOR NEXT