sushil karndak 
सोलापूर

अभिनेता भरत जाधव, विजय कदम येणार सोलापूरला 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला यंदा 6 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहिती सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची यांनी पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेनिमित्त अभिनेता भरत जाधव आणि अभिनेता विजय कदम सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. 
हेही वाचा - सोलापूरचा झेंडा मणिकोंडा नगरपालिकेत 
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, सिनेअभिनेते भरत जाधव, सिनेअभिनेते विजय कदम, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी कॉंग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका वैष्णवी करगुळे, श्रीदेवी फुलारी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते व आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. 
हेही वाचा - म्हणून वाचला विहिरीत पडलेला विक्रेता 
या स्पर्धा सकाळी आठ ते सायंकाळी नऊ यावेळेत होणार असून महाराष्ट्राच्या विविध भागातील 41 संघाने या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेचा लाभ सोलापूर शहर व जिल्ह्यातील नाट्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला प्रमुख कार्यवाह प्रा. ज्योतिबा काटे, सहकार्यवाह सुमीत फुलमामडी, सुहास मार्डीकर, कार्यकारणी सदस्य अशोक किल्लेदार, शांता येळंबकर, निमंत्रित सदस्य राजू रंगम आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Officer Ashwini Bidre Case : पत्नीची हत्या कोर्टात स्पष्ट, 10 वर्षांनंतरही मृत्यूचा दाखला मिळेना; अश्विनी बिद्रेंच्या पतीची इच्छामरणाची मागणी

झी मराठीचा गाजलेला नायक साकारणार स्टार प्रवाहच्या 'आनंदी' मालिकेत मुख्य भूमिका; गाजवलेली आधीची भूमिका

Latest Marathi News Live Update : अजितदादांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंगावर काटा आणणारा थरार! समोर वाघ आणि मागे विहीर; शेतकऱ्यासह बैलाची जीव वाचवण्यासाठी धडपड, शेवटी...

Shivaji Maharaj Viral Video : स्वच्छतागृहात शिवरायांचा अन् राणी पद्मावतींचा फोटो; नेटकऱ्यांनी आक्षेप घेताच बदलला फोटो...

SCROLL FOR NEXT