Corona Test
Corona Test 
सोलापूर

"या' गावात होतेय विलगीकरण केलेल्या आशा वर्कर्सची हेळसांड

उमेश महाजन

महूद (सोलापूर) : तालुक्‍यात सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या महूद (ता. सांगोला) येथील कोरोना विरुद्धच्या लढाईत आशा वर्कर आघाडीवर आहेत. मात्र यातील दोन पर्यवेक्षिका व एक आशा वर्कर अशा तिघींना कोरोना झाल्याने ही फळी मोडली आहे. या कोरोनाबाधित पर्यवेक्षिकेच्या संपर्कात आलेल्या सर्व आशा वर्कर्सना प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरण केले आहे. त्या ठिकाणी वीज, पाणी अशी कोणतीच सोय नसल्याने या आशा वर्कर्स संतप्त झाल्या आहेत. 

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे व्हेंटिलेटरवर असणारी सांगोल्याची आरोग्य यंत्रणा आशा वर्कर यांच्या योगदानावर चालत आहे. महूद येथील आरोग्य यंत्रणेचा अगदी सुरवातीपासून बोजवारा उडाला आहे. येथील आरोग्य यंत्रणेच्या समन्वय व नियोजनावर ग्रामस्थ व अधिकारी यांनी यापूर्वी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात येथील आरोग्य यंत्रणा आशा वर्कर यांच्या योगदानावर अवलंबून आहे. महूद येथे 11 अशा वर्कर्स व दोन पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. या सर्वजण अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. 

तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अशा वर्कर्स गेल्या चार महिन्यांपासून येथील कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर काम करत आहेत. कुटुंब सर्वेक्षण, जनजागृती, कोरोना बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी ही कामे करणे व त्याचे अहवाल सादर करतात. हे काम करत असताना यापैकी एक पर्यवेक्षिका रविवारी कोरोनाबाधित झाली. तिच्या नजीकच्या संपर्कातील दुसरी पर्यवेक्षिका व एक आशा या दोघींनाही कोरोनाची लागण झाली आहे. इतर आशा वर्कर्स यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे. त्यामध्ये या सर्वजणी निगेटिव्ह आढळून आल्या, मात्र या आठ आशा वर्कर्स व एका पर्यवेक्षिकेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरण होण्याचा सल्ला आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिला. त्यानुसार या नऊजणींना आरोग्य केंद्राच्या परिसरातील दोन खोल्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. नव्याने सापडलेल्या दोन कोरोनाबाधितांच्या संपर्कात इतर सातजणी गेल्या तीन दिवसांपासून एकत्र राहात आहेत. या खोल्यांमध्ये वीज व पाण्याची सोय नाही. 7 ते 9 ऑगस्ट या काळात अधिकृतपणे संपावर असतानाही गावात आम्ही कर्तव्यावर होतो. मात्र आम्हाला माणुसकीची वागणूक देण्यात आली नाही, अशी तक्रार त्या करत आहेत. 

विलगीकरण केल्यानंतर कोणीही आमची साधी विचारपूस सुद्धा केली नाही. आमच्यापैकी काहींना त्रास होत आहे, तरी औषधसुद्धा देण्यात आले नाही. उलट वैद्यकीय अधिकारी यांनी आम्हाला तुम्ही येथे का राहिला? तुम्ही येथून निघून जा, असे सुनावले असल्याचे त्यांनी सांगितले. आमच्या घरीही लहान मुले असून शेजारील लोक आमच्या कुटुंबाकडे संशयाने पाहात आहेत. अत्यल्प मानधनावर जोखमीचे काम करणाऱ्या आमच्याकडे येथील प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आमचे स्वॅब घेऊन ताबडतोब सोलापूर येथून तपासून आणावेत, ही एकमेव मागणी आहे, असे त्या सांगतात. येथील आरोग्य विभाग अतिशय वाईट वागणूक देत असल्याने यापुढे आम्ही हे काम करणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. 

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड म्हणाल्या, अतिशय कमी मानधनावर आशा स्वयंसेविका जोखमीचे काम करत आहेत. हे काम करताना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगीकरण केलेल्या ठिकाणी आवश्‍यक त्या सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडली पाहिजे व त्यांची तपासणी करून आवश्‍यक ते उपचार वेळेत करणे गरजेचे आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT