Admission to Shri Vitthal Temple between 6 am and 7 am without online booking for Pandharpur people
Admission to Shri Vitthal Temple between 6 am and 7 am without online booking for Pandharpur people 
सोलापूर

पंढरपूरकरांना ऑनलाइन बुकिंग न करता सकाळी सहा ते सातदरम्यान श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या तीन हजार भाविकांना श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. आता पूर्वीप्रमाणे सकाळी सहा ते सात या वेळात पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना ऑनलाईन बुकिंग न करता प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांनी दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे आठ महिने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. शासनाने 
16 नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरात ऑनलाइन दर्शनाचे बुकींग करून आलेल्या भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येत आहे. सुरुवातीस एक हजार भाविकांना दिवसभरात मुखदर्शनासाठी सोडले जात होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आली सध्या दिवसभरात तीन हजार भाविकांना मुख्य दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. 

पंढरपूरमधील स्थानिक नागरिकांना पूर्वी दररोज सकाळी सहा ते सात या वेळात ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग केले नसले तरी मंदिरात प्रवेश दिला जात असे. आता 5 डिसेंबरपासून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दररोज सकाळी सहा ते सात या वेळात मंदिरात मुखदर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. संबंधित नागरिकांना स्थानिक नागरिक असल्याविषयी आधार कार्ड अथवा मतदान कार्ड दाखवावे लागणार आहे. 

दररोज सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी चार ते पाच या वेळा व्यतिरिक्त सकाळी सात ते रात्री 10 या वेळात प्रत्येक तासाला दर्शनाचे ऑनलाईन बुकींग करून आलेल्या 250 लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिर समितीच्या वेबसाईट वरून ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करता येते. 65 वर्षाच्या पुढील लोक आणि दहा वर्षाच्या आतील मुले-मुली तसेच गर्भवती महिला, आजारी व्यक्ती यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असे मंदिर समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT