Printing Press 
सोलापूर

आठ दिवसांपासून सुरू मात्र "या' व्यवसायात 85 टक्के घटच 

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : लॉकडाउनमुळे अडीच महिने बंद असलेला प्रिंटिंग प्रेस व्यवसाय लॉकडाउन शिथिलीकरणामुळे 8 जूनपासून सुरू झाला. यामुळे मालक व कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, बाजारात अजूनही मंदीसदृश परिस्थिती असल्याने 85 टक्के व्यवसाय घटला आहे. त्यामुळे कामगार व मालकांमध्ये पुन्हा मरगळ आली आहे. 

लॉकडाउन काळात झाले मोठे नुकसान 
पुणे, मुंबई यासह आंध्र प्रदेश, तेलंगण व कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांतील छपाईची कामे सोलापुरात होत असल्याने प्रिंटिंग हब म्हणून सोलापूरची ओळख आहे. लॉकडाउनमुळे 200 प्रेस, शेकडो स्क्रीन प्रिंटर्स व सहा हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती. कोट्यवधींची गुंतवणूक केलेल्या मोठ्या व्यावसायिकांसह छोट्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर या व्यवसायातील थेट काम करणारे एक हजार 200 कामगार व या व्यवसायाशी निगडित डीटीपी ऑपरेटर, बाईंडिंग, पाकिटे तयार करणारे असे जवळपास सहा हजार कामगार बेरोजगार झाले होते. अडीच महिन्यांपासून मशिनरी थांबून असल्याने त्याचे स्पेअर पार्ट खराब झाले. शाई, केमिकल वाळून गेल्याने जवळपास प्रिंटिंग प्रेस व्यावसायिकांना दोन कोटींहून जास्त फटका बसला. 

कामगार मानताहेत अर्ध्या रोजगारावर समाधान 
आता लॉकडाउन शिथिलीकरणात यंत्रमाग उद्योगातील निर्यातदारांकडून टॉवेल लेबल, टॅग, पॅकिंग साहित्याची कामे व हॉस्पिटलसंबंधित कामे थोड्याफार प्रमाणात सुरू आहेत. दळणवळण बंद असल्याने इतर राज्यांतील व जिल्ह्यांतील कामे मिळण्यास अडचणी आहेत. शाळा- महाविद्यालयांची व शासकीय तसेच व्यावसायिक संबंधित कामेही सुरू नाहीत. केवळ 10 ते 15 टक्के कामांसाठी प्रिंटिंग प्रेस सुरू ठेवावे लागत आहेत, तेही केवळ चार तासांसाठी. यामुळे कामगारांनाही अर्ध्या पगारावर समाधान मानावे लागत आहे. 

व्यवसाय सावरायला लागेल एक-दीड महिना 
लॉकडाउननंतर प्रिंटिंग प्रेस सुरू झाले, मात्र कामेच नाहीत. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्यास कामांना वेग येईल मात्र शाळा कधी सुरू होतील याबाबत ठोस माहिती नाही. शासकीय व कमर्शिअल कामेही बंद असल्याने व्यवसाय अजून सावरला नाही. त्यासाठी आणखी एक-दीड महिना जावा लागेल. निदान व्यवसाय सुरू झाला यावरच सध्या आम्ही समाधान मानत आहोत. 
- नागेश शेंडगे, 
उपाध्यक्ष, सोलापूर मुद्रक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT