Agricultural pump can be started from home through Mobile Auto Technology without distance limitations sakal
सोलापूर

Agricultural Pump : ‘मोबाईल ॲटो’तून घरबसल्या चालू करता येईल कृषीपंप

पडसाळीच्या शेतकऱ्याचा अनुभव; अंतराची मर्यादा नसलेले तंत्रज्ञान

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शेतकऱ्यांना दिवसा वीज अजूनही पूर्णवेळ मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. रात्री-अपरात्री शेतात गेल्यावर शेतकऱ्यांचे अपघात होतात. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला, तर काहींना अपंगत्व आले आहे.

त्यावर मोबाईल ॲटो तंत्रज्ञानामुळे कायमचा तोडगा शक्य झाला असून पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रशांत भोसले या शेतकऱ्याने पाच वर्षांपासून हे तंत्रज्ञान यशस्वीपणे हाताळले आहे.

रात्रीच्या वेळी कृषीपंप सुरु करायला गेल्यावर सर्पदंश किंवा वन्यजीवांचा धोका असतो. अनेकदा चोरट्यांचीही भीती असते. अशावेळी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात कृषीपंप सुरु करायला जाण्याची गरज आता नाही.

त्यांच्यासाठी मोबाईल ॲटो हे नवतंत्रज्ञान बाजारात उपलब्ध आहे. आपण कोठेही परगावी, परराज्यात असलो, तरीदेखील आपल्या शेतातील कृषीपंप सुरु करण्याची सुविधा मोबाईलवर आहे.

केवळ मोबाईलला रेंज असणे आवश्यक आहे. त्यासाठी केवळ साडेपाच हजार रुपयांचा खर्च होतो. एक वर्षाची गॅरंटी आहे. लाइट आल्यावर किंवा गेल्यावर ही सिस्टिम आपल्याला मेसेज व कॉलद्वारे सांगते.

विद्युतपंप सुरु करायचा की नाही, अशी विचारणा देखील होते. लाइट फॉल्ट असल्यावर पंप बंद असल्याचेही सांगितले जाते. किती वेळ पाणी सोडायचे ते सेट करण्याची सुविधा देखील त्यात देण्यात आली असल्याचे श्री. भोसले यांनी सांगितले.

असे आहे ॲटो तंत्रज्ञान

  • एका ॲटो तंत्रज्ञानाला दहा मोबाईल नंबर सेट करण्याची सुविधा

  • दहा लोकांपैकी कोणीही वेळेनुसार पंप मोबाईलवरून सुरू करू शकतो

  • रात्री-अपरात्री कृषीपंप सुरु करण्यासाठी शेतात जाण्याची गरज पडत नाही

  • आपल्याला जेवढा वेळ कृषीपंप सुरु करायचा, तेवढी वेळ सेट करता येते

  • वीज गेली किंवा आल्यानंतर मोबाईलवर मेसेज किंवा कॉल येतो

मोबाईल ॲटो तंत्रज्ञानामुळे रात्री-अपरात्री लाइट आली तरी शेतात कृषीपंप सुरु करायला जाण्याची गरज भासत नाही. आपण कोठेही असलो तरीसुद्धा आपल्याला किती वेळ कृषीपंप सुरु करायचा आहे, तेवढा वेळ सेट करण्याची सुविधा त्यात आहे.

- प्रशांत भोसले, शेतकरी, पडसाळी, उत्तर सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT