Crime News esakal
सोलापूर

Solapur Crime : तुला जिवंत सोडणार नाही म्हणत 16 जणांचा तरुणावर हल्ला; लाकूड, लाथाबुक्क्यांनी मारहाण

याप्रकरणी गुडूलाल मशाक शेख (वय ३९, रा. आहेरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

यावेळी सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा पाहुणा व त्याच्या बहिणीलाही मारहाण केली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : दक्षिण सोलापूरमधील (South Solapur) आहेरवाडी परिसरात तरुणांना १० ते १५ जणांच्या टोळक्याकडून सळई, लाकडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सोळा जणांवर वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी गुडूलाल मशाक शेख (वय ३९, रा. आहेरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना आहेरवाडी येथे १ जुलै रोजी दुपारी घडली. फिर्यादी हे शेतातील वस्तीवर बसलेले असताना आरोपींनी त्यांना तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीचा पाहुणा व त्याच्या बहिणीलाही मारहाण केली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी संगमेश्वर महादेव बम्मणगे, पंचनाथ चंद्रकांत दिंडुरे, बसवराज नागनाथ बोरेगाव, राकेश सुभाष मुगळे, संतोष हणमंत माळी, सचिन श्यामराव सासवे, बसवराज प्रभू पिशानतोट, शुभम दिंडुरे, विजय कापसे, महेश बोरुटे, बाबूराव हडपद, सागर अडवीतोट, उमेश बम्मणगे, सिद्राम अमाती हदरे, पंचनाथ क्षेत्री, राजू क्षेत्री (सर्व रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

जखमींवरही गुन्हा दाखल

प्राण्याची हत्या केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नाईक अमोल माणिक यादव यांनी दिली आहे. गुलाल मशाक शेख (वय ३९, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर), सिराज नजीर अहमद पटेल (वय २८, रा. इंडी. कर्नाटक), असिफ दौलत बागवान ( वय ३०, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर).

तसेच जब्बार सलाउद्दीन काजी (वय ३२, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर), सेंपन सलाउद्दीन काजी (वय २९, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर), जहीर बशीर शेख (वय ३३, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांच्यावर प्राण्याची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT