Corona Test 
सोलापूर

अक्कलकोट तालुक्‍यात बाधितांची संख्या द्विशतकीपार; बुधवारी "रॅपिड' व स्वॅब टेस्टमधून विक्रमी "एवढे' रुग्ण आढळले 

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात आज बुधवारी एकाच दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने विक्रमी पल्ला गाठला असून, सलग दुसऱ्या दिवशी एकूण 30 रुग्ण आढळले आहेत. यात रॅपिड टेस्टचे 29 तर स्वॅब टेस्टचा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. 

अक्कलकोट तालुक्‍यात एकूण रुग्णांची संख्या 226 इतकी झाली असून, आतापर्यंत अक्कलकोट शहरात आठ व ग्रामीणमध्ये दोन असे दहाजणांचा मृत्यू झाला आहे. 95 बाधित बरे झाले असून 121 बाधितांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये अक्कलकोट शहरातील 51 व ग्रामीण भागातील सात बाधितांवर उपचार सुरू आहेत. रॅपिड अँटिजेन टेस्टमधून चार दिवसांत एकूण 63 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये बुधवारी 29 रुग्ण आढळले आहेत. त्यात अक्कलकोट शहरातील भारत गल्लीतील एक, खासबाग गल्लीतील एक, विजयनगर पाच, माणिक पेठ एक असे आठ रुग्ण हे रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये तर ग्रामीण भागातील किणी एक, समर्थनगर एक, मैंदर्गी 19 अशा प्रकारे 21 रुग्णांचा समावेश आहे. याप्रमाणे रॅपिड अँटिजेन टेस्टमधून बुधवारी अक्कलकोट शहरात आठ तर ग्रामीण भागात 21 असे एकूण 29 रुग्ण वाढले आहेत. त्याचप्रमाणे स्वॅब अहवालामधून किणी येथील एक रुग्ण आढळून आला आहे. दररोज तालुक्‍यातील अनेक नवीन गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने व संख्या द्विशतकाच्या पार गेल्याने भीतिदायक वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी केलेल्या 92 रॅपिड अँटिजेन टेस्टमधून 29 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 

पुन्हा लॉकडाउनमुळे नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी 
अक्कलकोटला मागील आठवड्यात जनता कर्फ्यू होता, त्यामुळे सर्व व्यापारी व नागरिकांची बाजार करण्यासाठी सर्वत्र प्रचंड गर्दी उसळली आहे. नागरिकांची धडपड पाहिली तर कोरोनाची ना भय ना चिंता दिसत आहे. आता लगेच शुक्रवारपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कडक लॉकडाउन सुरू होणार आहे, तेही दहा दिवस. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अक्कलकोटला मागील 24 मार्चपासून बोटावर मोजण्याइतके दिवस दुकाने सुरू होती, त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

LPG New Connection Update : नवीन एलपीजी कनेक्शनसाठी बुकिंग कधीपासून सुरू होणार? सरकारने स्पष्ट केली स्थिती

Central Railway: कोकणकरांसाठी आनंदवार्ता! मुंबई-मडगावदरम्यान गणपती विशेष गाड्या; कुठून, कधी धावणार ट्रेन?

‘फुलों का तारों का’ गाण्याची भन्नाट गोष्ट! लता मंगेशकरांनी काढला चक्क 10 वर्षांच्या मुलाचा आवाज

Marathi News Live Updates : नेपाळमधील महापुराची परिस्थिती अत्यंत गंभीर; ओवेसींकडून मदतीचे आवाहन

SCROLL FOR NEXT