akluj.jpg 
सोलापूर

अकलूज ग्रामपंचायतीद्वारा मागील पाच वर्षात चाळीस कोटी रुपयांची कामे : सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील 

शशिकांत कडबाने

अकलूज(सोलापूर)ः अकलूज ग्रामपंचायतीने गत पाच वर्षांच्या काळात सुमारे 40 कोटी रुपयांची विकासकामे केली असल्याची माहिती सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी दिली 

अकलूज ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत धडाडीने काम करणारे युवा सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचा सरपंचपदाची पाच वर्ष पूर्ण झाल्यबद्दल ग्रामपंचायतीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते 
मोहिते पाटील पुढे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी पदभार स्वीकारताना ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी व खर्चाचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे खर्च कमी करणे व उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले. प्रथम जीपीएस प्रणालीद्वारे घरपट्टिचे पूनर्सर्वे केले त्यामुळे सुमारे 2800 घरे वाढली व दरवर्षी 80 लाखाचे उत्पन्न वाढले. 

ग्रामपंचायतीने जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टी विकास कार्यक्रम राबविला होता. तोच कार्यक्रम शहरातल्या सर्व झोपडपट्टीसाठी राबविला. सुमारे 80 लाखाचा निधी खर्चून 702 झोपडपट्टी पुनर्वसन 3500 नागरीकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. 
ग्रामपंचायतीतील महत्वाची कागदपत्रे सुमारे 40 लाख खर्च करीत स्कॅनिंग करून संगणीकृत केली असून या संगणीकरणामुळे नागरीकांना फायदा होत आहे. जिल्हा परिषद सदस्या शितलदेवी मोहिते पाटील यांच्या व 14 व्या वित्त आयोगातून वार्ड क्रमांक 3, 4 व 5 मध्ये सुमारे दिड कोटीची जीआय लाईन पाइपलाइनद्वारे पाणीपूरवठा योजना राबविली. 
याचबरोबर सीसीटिव्ही ध्वनीप्रक्षेपासह, पुतळा सुशोभिकरण, ओढ्यांचे खोलीकरण व रूंदीकरण, वृक्षारोपन, शिधापत्रिका वाटप, रेन वाटर हार्वेस्टिंगला सानुग्रह अनुदान, घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली, जिल्हा परिषद शाळांना ई लर्नींग स्मार्टक्‍लास, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ फिल्टर व शालेय साहित्य आदि उपलब्ध करून दिले आहे. यासह 28.6 किमीचे रस्ते, 4 किमीची गटर, दिवाबत्ती आदीसह 39 कोटी 67 लाख 24 हजा 457 रुपये निधीची कामे झाली आहेत. 
कार्यकाल संपल्याने राहिलेल्या विकास कामाबाबत मोहिते पाटील यांनी अकलूजच्या विकासासाठी भुयारी सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा सुधारणेसाठी 77 मैलापासून विझोरी साठवण तळ्यापर्यंत पाईपलाईन, शहरातील लाईटची खांब तारा काढून जमिनीखालून वीजवहन आदि कामांची अंदाजपत्रके तयार केली असल्याचे सांगितले. 

कोणताही अनुभव नसाताना माजी खा. विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाबरोबरच किशोरसिंह माने पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख यांच्या अनुभवामुळे आपण विकासकामे उभा करू शकलो असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. 
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

अग्रलेख : डिजिटल अरेस्ट

AFG vs SL Live : श्रीलंकेचा 'कुशल' विजय! अफगाणिस्तानचे आव्हान संपुष्टात; बांगलादेशला लागली लॉटरी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT