Gouri 
सोलापूर

मंगळवारी दुपारी दोननंतर करा गौरी आवाहन : पंचांगकर्ते मोहन दाते

श्याम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर) : गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. गणपतीबरोबरच घरोघरी ज्येष्ठा गौरीच्या आगमनाचेही वेध लागले आहेत. गौरी आवाहन मंगळवारी (ता. 25) अनुराधा नक्षत्रावर दुपारी एक वाजून 59 मिनिटांनंतर करता येईल, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीला गणरायाच्या पार्थिव मूर्तीची प्रतिष्ठापना घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांतर्फे केली जाते. भव्य मिरवणुका, गुलालाची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, भव्य लेझीम पथकांचे डोळ्यांचे पारण फिटणारी कला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच बाजारपेठांमध्ये गणेश मूर्ती व पूजा साहित्य खरेदीसाठी आबालवृद्धांची गर्दी असते. लहान मंडळांतील चिमुकल्यांचाही हलगी व ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्याचा कल असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या महामारीमुळे या सर्व गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. मात्र घराघरातून त्याच उत्साहात गणेशोत्सव होत आहे. 

गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी गौरी आगमनाचेही वेध लागतात. दरवर्षी ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर केले जाते. यंदा भाद्रपद सप्तमी मंगळवारी (ता. 25) असून अनुराधा नक्षत्र दुपारी 1 वाजून 59 मिनिटांनंतर आहे. त्यामुळे दुपारी दोननंतर घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. गौरीपूजन भाद्रपद अष्टमीला ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते. बुधवारी (ता. 26) ज्येष्ठा नक्षत्र दिवसभर असल्याने आपापल्या सोयीने दिवसभर गौरीपूजन, नैवेद्य व आरती करता येणार आहे. गौरी विसर्जन (गाठी घेणे) मूळ नक्षत्रावर केले जाते. गुरुवारी (ता. 27) दुपारी 12 वाजून 37 मिनिटांनंतर मूळ नक्षत्र असल्याने मध्यान्हानंतर गौरी विसर्जन (गाठी घेणे) करता येईल, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT