Ujani Dam
Ujani Dam Canva
सोलापूर

उजनीत सांडपाणीच येत नाही ! पेडगाव येथील बंधाऱ्यावर केली शिवाजी बंडगरांनी पाहणी

अण्णा काळे : सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर) : सोलापूरच्या वाट्याचे एक थेंब देखील पाणी घेणार नाही, उजनीत येणारे सांडपाणी नेणार आहोत, हा पालकमंत्र्यांचा दावा निखालस खोटा असून, जे सांडपाणी उजनीतून (sewage in the Ujani dam) उचलायचं म्हणताहेत ते पाणीच उजनीत येत नसल्याची माहिती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी बंडगर (Shivaji Bandagar, Chairman, Karmala Agricultural Produce Market Committee) यांनी दिली आहे. पुण्याच्या खालील बाजूस भीमा नदीवर (Bhima River) असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या सहा साखळी बंधाऱ्यांपैकी शेवटच्या असलेल्या पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील बंधाऱ्यावर जाऊन श्री. बंडगर यांनी पाहणी केली. यानंतर त्यांनी ही माहिती दिली. (An inspection revealed that there was no sewage in the Ujani dam)

श्री. बंडगर म्हणाले, पुणे, पिंपरी- चिंचवड परिसरातून 16.5 टीएमसी पाण्याचा हिशेब सांगताना मुंढव्याजवळ जुना मुठा कालव्यातून खडकवासला कॅनॉलमध्ये 6.5 टीएमसी पाणी लाभश्रेत्रासाठी सोडले जाते. तसेच पुरंदर योजनेतून 4 टीएमसी पाणी सोडले जाते असे सांगितले जाते. उर्वरित 5 टीएमसी सांडपाणी भीमा नदीवाटे उजनीत येते व हे पाणी उजनीतून उचलून आम्ही शेटफळगडे येथे खडकवासला कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करणार असल्याचे सांगून सोलापूर जिल्ह्याची फसवणूक केली जात आहे. कारण, जे 5 टीएमसी सांडपाणी पाणी उजनीत येत असल्याचे सांगितले जाते ते प्रत्यक्षात उजनीत येत नाही.

सिद्धटेक ते पुणे दरम्यान एकूण सहा कोल्हापूर पद्धतीचे बंधारे 15 आक्‍टोबरनंतर बंद केले जातात. त्यामुळे पाणी खाली येतच नाही. जागोजागी भीमेच्या तीरावर हजारो एकर शेतीसाठी हजारो शेतीपंप असून हेच सांडपाणी दोन्ही तीरावरील शेतीला दिले जात आहे. दौंड सारख्या मोठ्या शहराला तसेच तिरावरील सर्व गावांना याच पाण्यातून पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे उजनीत 15 आक्‍टोबरनंतर सांडपाणीच येत नाही. या सहा बंधारा साखळीत सध्या कसलंच पाणी नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. त्यामुळे उजनीतून मूळ सिंचन आराखड्यातूनच सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सरकार नेणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सांडपाण्याला काय उजनीमध्ये वेगळा कप्पा आहे की काय, असा खोचक प्रश्नही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मनसे, ठाकरे गटाचा अर्ज

SCROLL FOR NEXT