crime news solapur esakal
सोलापूर

आर्थिक फसवणूक घोटाळा प्रकरण; दोघांना पोलिस कोठडी

बार्शीतील आर्थिक फसवणूक प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

बार्शीतील आर्थिक फसवणूक प्रकरण

बार्शी : शेअर बाजार गुंतवणुकीचे(share market) अमिष दाखवून पाच कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात न्यायालयांने(solapur dsitrict court) शनिवारी (ता.१५) दोन आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरातील उपळाई रस्त्यावर विशालका कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि., अलका शेअर सर्व्हिसेस, जे.एम.फायनान्सियल सर्व्हिसेस अशा तीन वित्तीय संस्था स्थापन करुन शेअरमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवून ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक करुन बार्शी न्यायालयात (barshi court)उभे केले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश ए.बी.भस्मे यांनी गुरुवार (ता.२०) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. वैभव अंबादास फटे व अंबादास गणपती फटे अशी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील संशयित विशाल अंबादास फटे, राधिका विशाल फटे, अलका अंबादास फटे हे फरार आहेत.

या प्रकरणी दीपक बाबासाहेब अंबारे यांनी फिर्याद दाखल केली होती. ही घटना २०१९ पासून ९ जानेवारी २०२१ दरम्यान घडली. विशाल फटे याने स्थापन केलेल्या तीन कंपन्यांमधून व्यवहार करुन शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा कंपन्यांच्या खात्यावर घेत असे. गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवीत होता. या रकमा आरटीजीएस, धनादेशद्वारे व रोख स्वरुपात त्याने स्विकारल्या.

बार्शी शहर (barshi city)व परिसरातील नागरिकांना ट्रेडिंगमध्ये पैसे(fraud case) गुंतवून दररोज दोन टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. आमिषाला बळी पडून नातेवाइकांकडून, हातउसने पैसे घेऊन विशाल फटे याच्या तीन कंपन्यांच्या खात्यामध्ये अनेकांनी गुंतवणूक केली होती. यामध्ये दीपक अंबारे ९६ लाख २५ हजार रुपये, किरण अंबारे ५० लाख, संग्राम मोहिते ३ कोटी ६० लाख २० हजार, रोहित व्हनकळस ३५ लाख, सुनिल जानराव २० लाख, हनुमंत ननवरे २ लाख अशी एकूण ५ कोटी ६३ लाख २५ हजार रुपये गुंतवणूक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक (arrested 2 persons)केली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास शेळके करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Latest Maharashtra News Updates: आरबीआयचे महागाई सर्वेक्षण सूरु

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT