bird sakal
सोलापूर

सोलापूर :नारंगी पायाच्या कलहंसाचे आगमन

उजनीत जलशयात दिसून आला दुर्मिळ पक्षी; पक्षीनिरीक्षकाकडून निरीक्षण

सकाळ वृत्तसेवा

उजनीत जलशयात दिसून आला दुर्मिळ पक्षी; पक्षीनिरीक्षकाकडून निरीक्षण

सोलापूर : उजनी जलाशयात(ujani dam) प्रथमच नारंगी पायाचा कलहंस(kalhans bird) किंवा टुंड्रा बीन हंस पक्ष्याचे मागील काही आठवड्यापासून दर्शन होत आहे. हा पक्षी राजहंस (पट्टकादंब) पक्ष्याच्या थव्याबरोबर स्थलांतर करीत येथे आला आहे. हा दुर्मिळ पक्षी (Rare birds)पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार उजनी जलाशयाला भेट देत आहेत.नारंगी पायाचा कलहंस किंवा टुंड्रा बीन हंस (Anser serostris) हा एक हंस असून यात दोन भिन्न प्रकार आहेत. एक टायगा आणि एक टुंड्रा. बीन हंस याच्या पाच उपप्रजाती आहेत, ज्यात शरीराचा आकार आणि चोचीचा कार आणि नमुना यामध्ये जटिल फरक आहे. हिवाळ्यात बीनच्या (द्विदल धान्य) शेतात यांच्या चरण्याच्या सवयीवरून त्यांचे नाव बीन हंस असे पडलेले आहे. बीन हंस हा उत्तर युरोप आणि युरोसिबेरियामध्ये प्रजनन करतो.

हिवाळ्यामध्ये हे दक्षिणेकडे स्थलांतर करीत युरोप आणि आशियामध्ये येतात. अमेरिकन ऑर्निथोलॉजिकल सोसायटी आणि इंटरनॅशनल ऑर्निथोलॉजिस्ट युनियनने हे टुंड्रा बीन हंस आणि टायगा बीन हंस यांना स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता दिली आहे. उजनी जलाशयात प्रथमच नारंगी पायाचा कलहंस किंवा टुंड्रा बीन हंस पक्ष्याचे मागील काही आठवड्यापासून दर्शन होत आहे. हा पक्षी राजहंस (पट्टकादंब) पक्ष्याच्या थव्याबरोबर स्थलांतर करीत येथे आला आहे. हा दुर्मिळ पक्षी पाहण्यासाठी अनेक पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार उजनी जलाशयाला भेट देत आहेत

नारंगी पायाचा कलहंस किंवा टुंड्रा बीन हंस (Anser serostris) हा एक हंस असून यात दोन भिन्न प्रकार आहेत. एक टायगा आणि एक टुंड्रा. बीन हंस याच्या पाच उपप्रजाती आहेत, ज्यात शरीराचा आकार आणि चोचीचा कार आणि नमुना यामध्ये जटिल फरक आहे. हिवाळ्यात बीनच्या (द्विदल धान्य) शेतात यांच्या चरण्याच्या सवयीवरून त्यांचे नाव बीन हंस असे पडलेले आहे. बीन हंस हा उत्तर युरोप आणि युरोसिबेरियामध्ये प्रजनन करतो. हिवाळ्यामध्ये हे दक्षिणेकडे स्थलांतर करीत युरोप आणि आशियामध्ये येतात(aisa and europe). अमेरिकन ऑर्निथोलॉजिकल सोसायटी आणि इंटरनॅशनल ऑर्निथोलॉजिस्ट युनियनने(International Ornithologists Union) हे टुंड्रा बीन हंस आणि टायगा बीन हंस यांना स्वतंत्र प्रजाती म्हणून मान्यता दिली आहे.

हा पक्षी (bird news)ओळखण्यासाठी प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे यांच्या पंखांचा तपकिरी क्रीम/ बफ राखाडी पांढरा रंग, नारंगी रंगाचे पाय, काळी नारंगी मध्यम लांबी बदकासारखी मध्यम जाडीची चोंच. यांचा नैसर्गिक अधिवास शेतजमीन गवताळ प्रदेश पाणथळ जागा याठिकाणी असतो. त्यांचा आवाज मोठा कर्णकर्कश असतो. टुंड्रा बीन हंस ही बीन हंसची सर्वात सामान्य प्रजाती आहे.

- डॉ. व्यंकटेश मेतन, पक्षी अभ्यासक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT