Ashadhi Wari 2023 esakal
सोलापूर

Ashadhi Wari 2023 : मुस्लिम समाजाचा हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्यासाठी निर्णय !

आषाढी एकादशी दिवशी मंगळवेढा शहर व तालुक्यात बकऱ्याची कुर्बानी होणार नाही!

दावल इनामदार

Ashadhi Wari 2023 - हिंदू धर्मातील पवित्र आषाढी एकादशी व मुस्लिम धर्माचे पवित्र ईद उल जुहा तथा बकरी ईद गुरुवारी दि.29 जून या दोन्हीही सण एकाच दिवशी येत आहेत.

मंगळवेढा तालुक्यात गेली 50 वर्षापासून हिंदू मुस्लिम उत्सव सामाजिक सलोख्याने व शांततेने पार पाडत असून आतापर्यंत कुठेलेही गालबोट लागले नाही असा आदर्श येथील हिंदू मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. तसेच पुढेही हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोख्यासाठी मुस्लिम समाजाने मंगळवेढा शहर व तालुक्यात

ईद उल्-जुहा ची नमाज ईदगाह मैदान व मोहल्ल्यातील मस्जिद मध्ये सामुदायिक नमाज पठण सकाळी होणार आहे तसेच बकऱ्याची कुर्बानी आषाढी एकादशी दिवशी करण्यात येणार नाही असा समाजाभिमुख निर्णय घेतला आहे.

मंगळवेढा तहसील कार्यालयात तहसीलदार मदन जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व परिविक्षाधीन आयपीएस अधिकरी तथा मंगळवेढा पोलीस निरीक्षक नयोमी साटम यांचे प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

मंगळवेढयाचे आमदार समाधान आवताडे यांनी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी करू नये इतर दिवशी कुर्बानी करावी अशी विनंती मुस्लिम समाजास केली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाने मुस्लिम समाजाची बैठक आयोजित केली होती.

तहसीलदार मदन जाधव यांनी आषाढी एकादशी दिवशी कुर्बानी न करता सहकार्य करावे असे आवाहन केले.तर परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी नयोमी साटम यांनी सोशल मिडीया बाबत सतर्क राहून अफवा विषयी पोलीस प्रशासनास माहिती द्यावी अशा सूचना केल्या.

या बैठकीत मंगळवेढा मुस्लिम जमियतचे चेअरमन फिरोज मुलाणी यांनी मंगळवेढा शहर व तालुक्यातील हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोखा महाराष्ट्राला आदर्श देणारा असून आ.समाधान आवताडे व प्रशासनाने केलेल्या विनंतीचा सन्मान राखून आषाढी एकादशी दिवशी बकऱ्याची कुर्बानी न करता दुसऱ्या दिवशी कुर्बानी मुस्लिम समाजकडून करण्यात येईल तसेच याबाबत ग्रामीण भागात प्रत्येक पोलीस पाटील यांना सूचना देण्यात यावेत असे सांगितले.

प्रशासन व मुस्लिम समाजाने एकमताने आषाढी एकादशी दिवशी बकऱ्याची कुर्बानी न करण्याचा निर्णय घोषित केला.

याबैठकीस मुस्लिम जमियतचे व्हा.चेअरमन सरोज काझी, मुस्लिम जमियतचे सचिव आझाद पटेल,खिदमत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष नजीर इनामदार, मुस्लिम जमियतचे सदस्य जब्बार सुतार, सुतार समाजाचे अबुबकर सुतार,मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दावल इनामदार,अझर काझी मदिना गॅरेजचे संचालक अदनान काझी व प्रशासकीय अधिकारी उपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Cyber Crime : मुंबई पोलिस–न्यायालयाचा सेट! निवृत्त प्राध्यापकाचा व्हिडिओ कॉलवरून छळ, भीतीने ७९ लाख दिले अन्

8th Pay Commission: २०२६ पासून पगार वाढणार की वाट पाहावी लागणार? ८व्या वेतन आयोगावर धक्कादायक अपडेट, संसदेत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : वंचित राहिलेल्या ९७० शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई द्या- वैभव नाईक

"भविष्यात तुम्हाला जे काही व्हायचं आहे ते .." जेन-झींना शरद पोंक्षेंनी दिला ‘हिमालया’ एवढा मोलाचा सल्ला

Statue of Liberty: काही सेकंदात भीषण दुर्घटना… स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अचानक कोसळली, थरारक VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT