नियमबाह्य कर्ज वाटपप्रकरणी बॅंकेचे अधिकारी गोत्यात! चौकशीचे आदेश Canva
सोलापूर

नियमबाह्य कर्ज वाटपप्रकरणी बॅंकेचे अधिकारी गोत्यात! चौकशीचे आदेश

नियमबाह्य पीककर्ज वाटपप्रकरणी बॅंकेचे अधिकारी गोत्यात! प्रशासक कोतमिरेंनी दिले चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

नियमबाह्य पीक कर्ज वाटप केल्याप्रकरणी ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी चांगलीच चर्चेत आली आहे.

पंढरपूर (सोलापूर) : नियमबाह्य पीक कर्ज वाटप केल्याप्रकरणी ओझेवाडी (ता. पंढरपूर) (Pandharpur) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी चांगलीच चर्चेत आली आहे. जिल्हा बॅंकेचे (DCC Bank) पीक कर्ज वाटपाचे सर्व नियम धाब्यावर बसवून सोसायटीने बोगस पीक कर्ज वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून पुढे आला आहे. त्यामुळे हे प्रकरण बॅंक अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगाशी येण्याची शक्‍यता आहे.

या प्रकरणी आता पंढरपुरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शाखा व्यवस्थापक देखील गोत्यात येण्याची शक्‍यता आहे. नियमबाह्य पीककर्ज वाटप प्रकाराची बॅंकेने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित बॅंक अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

ओझेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांनी आपल्या मर्जीतील सभासदांना नियमबाह्य पीककर्ज वाटप केल्याची तक्रार राजाराम गायकवाड, अनिल वाघमोडे व शहाजी नागणे यांनी बॅंकेकडे केली होती. त्यानुसार बॅंकेने पंढरपूर येथील वरिष्ठ अधिकारी मिलिंद देशपांडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. देशपांडे यांनी चौकशी अहवाल बॅंकेला दिला होता. दरम्यान, देशपांडे यांनी दिलेला अहवाल वस्तुनिष्ठ नसल्याची तक्रार गायकवाड व नागणे यांनी प्रशासक कोतमिरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार आर. एन. जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. जाधव यांनी दिलेल्या अहवालातून नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशपांडे व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पूर्वीचा चौकशी अहवाल संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

या प्रकरणी पंढरपुरातील बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चळे येथील शाखा व्यवस्थापकाकडे बॅंकेने खुलासा मागितला आहे. बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ओझेवाडी येथील सोसायटीने नियमबाह्य पीक कर्ज वाटप केल्याचे चौकशी अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणी बॅंकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

- शैलेश कोतमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT