सोलापूर

काँग्रेस vs राष्ट्रवादी; बार्शीत वातावरण तापलं!

सकाळ वृत्तसेवा

बार्शी पोलिस तपास करीत आहेत.

बार्शी (सोलापूर) : शहरातील काँग्रेस अध्यक्षाचा मोबाईल बळजबरीने घेऊन त्यातील डेटा व्हायरल करीन, मुलाबाळासह जीवंत जाळीन, बदनामी करीन अशी धमकी दिल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत नगर पालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांसह तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (barshi city police filed an unsolved crime against the municipal opposition leader)

नागेश हरिभाऊ अक्कलकोटे ( विरोधी पक्षनेता रा.खुरपे बोळ), राकेश उर्फ बाळू तातेड (रा. सुभाषनगर), पंकज शिंदे (रा.कसबा पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. जीवनदत्त महादेव आरगडे (रा.जिजामाता कॉलनी) यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शुक्रवार (ता.२८) रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली.

काँग्रेस (आय) पक्षाचे शहर अध्यक्ष जीवनदत्त आरगडे भगवंत मंदिराकडे जात असताना तानाजी चौक येथील प्लाझा मंगल कार्यालयाजवळ तिघांनी अडवून माजी आमदार दिलीप गंगाधर सोपल यांच्याविरुध्द व नागेश अक्कलकोटे यांची सक्तवसुली संचलनालय कार्यालय मुंबई येथे दिलेली बेहिशोबी मालमत्ता चौकशीची तक्रार मागे घ्यावी, तसेच आर्यन शुगर्स लि.खामगाव या साखर कारखान्याबाबत मुंबई उच्च न्यायालय येथे कसलीही याचिका दाखल करु नये अन्यथा मुलांबाळासह जीवंत जाळून टाकीन अशी धमकी दिली.

मोबाईल फोन घेऊन फोटो, रेकॉर्डिंग डेटा व्हायरल करुन तुझी बदनामी करीन असे म्हणून शिवीगाळ केली असल्याचे अदखलपात्र फिर्यादीत आरगडे यांनी म्हटले आहे. बार्शी पोलिस तपास करीत आहेत. (barshi city police filed an unsolved crime against the municipal opposition leader)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

Latest Marathi Live Updates : दार्जिलिंग रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी; बचावकार्य पूर्ण

Goa Monsoon Trip: सोनेरी वाळू अन् रूपेरी लाटा.... 'या' 5 कारणांमुळे पावसाळ्यात गोवा ट्रिप बनवू शकता खास

IND vs AFG : सुपर-8च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल... 'या' स्टार खेळाडूची होणार एंट्री?

SCROLL FOR NEXT