Corona Test 
सोलापूर

बार्शीत कोरोनाचा कहर सुरूच; गुरुवारी आढळले 25 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या 883 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात कोरोना विषाणू संसर्गाचा कहर सुरूच असून, गुरुवारी (ता. 30) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या 39 स्वॅब व रॅपिड अँटिजेन तपासणी अहवालामध्ये 25 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 475 जण बरे होऊन घरी गेले तर बाधितांची एकूण संख्या 883 झाली आहे. आज एकाचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत कोरोनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार डी. बी. कुंभार यांनी दिली. 

गुरुवारी 31 स्वॅब व आठ रॅपिड अँटिजेन अहवालात शहरातील अलीपूर रोड 2, आडवा रस्ता 8, दत्तनगर 1, भरतपूर 1, भवानी पेठ 1, नागणे प्लॉट 1, नेटके प्लॉट 1, खुरपे बोळ 1, गोंदिल प्लॉट 1, हिरेमठ हॉस्पिटलजवळ 1, सोलापूर रोड 1 असे 19 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. 

ग्रामीण भागातील वैराग येथे 2, उपळे दुमाला 1, धोत्रे 1, आगळगाव 1, खामगाव 1 असे सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील 472 व ग्रामीण भागातील 411 असे 883 जण बाधित असून 376 जणांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 95, वैराग 46, धोत्रे 5, सारोळे 1, दहिटणे 1, आगळगाव 1, खामगाव 2 असे 166 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कुंभार यांनी दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT