Google
सोलापूर

सिमकार्ड व्हेरिफिकेशन करताय? तर जरा सावधान! बॅंक बॅलन्स होऊ शकतो गडप

सकाऴ वृत्तसेवा

सोलापुरात सलग घडलेल्या तीन घटनांतून सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आला असून, यात लाखोंची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

सोलापूर : कोणाच्या सांगण्यावरून सिमकार्ड व्हेरिफिकेशन ऑनलाइन (SIM card verification online) करीत असाल तर जरा सावधान. तुमच्या बॅंकेतील सेव्हिंग रक्‍कम वा इतर बॅंक बॅलन्स (Bank balance) गडप होऊ शकतो. सोलापुरात सलग घडलेल्या तीन घटनांतून सायबर गुन्हेगारीचा (Cybercrime) नवा प्रकार समोर आला असून, यात लाखोंची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

"तुमच्या मोबाईल सिमकार्डची कागदपत्रे पेडिंग असून व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला दहा रुपयांचा ऑनलाइन रिचार्ज करावा लागेल', असे सांगून एका अनोळखी व्यक्तीने 20 जून रोजी सेवानिवृत्त प्राचार्य बसवराज कोनापुरे (रा. सुविधा नगर, सोलापूर) यांना पन्नास हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी शनिवारी (ता.26) विजापूर नाका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मोबाईल कंपनीतून बोलतोय असे सांगून, एका अनोखी इसमाने कोनापुरे यांना सिमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी मोबाईलवर दहा रूपयांचा ऑनलाइन रिचार्ज करण्यात सांगितले. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी विचारून घेतला आणि त्यावरून त्यांच्या बॅंक खात्यातून तीन टप्प्यात 50 हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले.

दुसऱ्या घटनेत एका सेवानिवृत्त बॅंक कर्मचाऱ्याचीच आर्थिक फसवणूक झाली आहे. राजेंद्र गंगाधर पाटील (रा. दत्त नगर, जुळे सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. मोबाईल सिमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी त्यांना 17 जूनला कॉल आला व त्यांनी दहा रूपयांचा ऑनलाइन रिचार्ज केला. त्यानंतर त्यांच्या बचत खात्यातून एक लाख 86 हजार रूपये ऑनलाइन काढून घेतले गेले. तसेच, त्यांच्या फिक्‍स डिपॉझिटवर तब्बल सात लाख 30 हजारांचे कर्ज काढून त्यांची एकूण नऊ लाख 16 हजार रूपयांची फसवणूक केली. याप्रकरणीही विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तर तिसऱ्या घटनेत एका डॉक्‍टर महिलेला आर्थिक फटका बसला आहे. शिवाजी नगर, बाळे येथील डॉ. मीरा तीर्थकर असे त्यांचे नाव आहे. त्यांनाही 6 एप्रिल रोजी अनोळखी इसमाने सिमकार्डचे व्हेरिफिकेशन करायचे आहे, असे सांगून एक ऍप डाउनलोड करण्यास सांगितले. नंतर त्यांच्या बॅंकेतील सेव्हिंग अकाउंटमधून 46 हजार रुपये ऑनलाइन काढून घेतले. याप्रकरणी डॉ. तीर्थकर यांनी 23 जून रोजी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तिन्ही घटनात "सिमकार्ड व्हेरिफिकेशन'च्या कारणाचे साम्य आहे. त्यामुळे ऑनलाइन रिचार्ज करताना, सिमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी माहिती देताना, सिमकार्ड ऍक्‍टिव्हेशन विषयक ओटीपी किंवा तत्सम काही माहिती सांगताना समोरचा व्यक्ती कोण आहे? याची आगोदर खात्री करणे गरजेचे आहे. अन्यथाही तुम्हाला आर्थिक झटका बसू शकतो. पोलिसांच्या सायबर क्राईम विभागापुढेही या सायबर गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

अशी होतेय फसवणूक

- अनोळखी व्यक्तीकडून एसएमएस किंवा फोनद्वारे सिमकार्ड व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्रांची माहिती घेतली जाते.

- एखादी लिंक ओपन करण्यास किंवा ऍप डाउनलोड करण्यास सांगितले जाते.

- त्यानंतर दहा- वीस रुपयांचा ऑनलाइन रिचार्ज करण्यास सांगितले जाते.

- मग मोबाईलवर येणारा ओटीपी किंवा कोड विचारून घेतला जातो.

- त्या ओटीपी/ कोडच्या आधारे सायबर गुन्हेगार संबधित व्यक्तीच्या बॅंक खात्यातील पैशांवर डल्ला मारतात.

नागरिकांनी सिमकार्ड व्हेरिफिकेशन शक्‍यतो संबधित कंपनीच्या स्टोअर, ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांच्या समक्ष करावे. नेटबॅंकींगचा वापर करताना ओटीपी, कोड व इतर माहिती कोणाशीही शेअर करू नये. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही ऍप डाउनलोड करू नका किंवा त्यांनी पाठविलेल्या लिंक ओपन करू नका. ऑनलाइन मोबाईल रिचार्ज करतानाही योग्य ती दक्षता घ्या.

- विशेद्रसिंग बायस, पोलिस उपनिरीक्षक, सायबर क्राईम सेल, सोलापूर शहर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT