Solapur Sakal
सोलापूर

राज्य शासन तसेच लातूर पोलिसांना खंडपीठाची नोटीस

लातूर पोलिसांना नोटीस बजावली आणि १३ सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : आईच्या उपचारासाठी वापरण्यात आलेले रेमडेसिवीर (Remedesivir) इंजेक्शन बोगस असल्याप्रकरणात दाखल फौजदारी याचिकेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. टी. देशमुख (S.T.Deshmukh) आणि न्या. एम. डी. सूर्यवंशी (M.D.Suryavanshi) यांच्या खंडपीठाने राज्य शासनासह (State Goverment) लातूर पोलिसांना (Latur Police) नोटीस बजावली आणि १३ सप्टेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.

उदगीर (जि. लातूर) येथील महेशकुमार जिवणे यांनी दाखल केलेल्या फौजदारी याचिकेत म्हटल्यानुसार, १२ एप्रिल २०२१ रोजी कोविडमुळे त्यांच्या आईला उदगिर हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करुन घेतले होते. त्यांना रेमडेसिवीरचे सहा डोस देण्यास सांगितले होते. हॉस्पिटलनेच इंजेक्शनची व्यवस्था केली. त्यापोटी प्रत्येकी पंधरा हजार रुपये आकारले. परंतू, रेमडेसिवीरचे सहा डोस देऊनही जिवणे यांच्या आईला वाचविता आले नाही.

दरम्यान जिवणे यांच्याकडे दोन इंजेक्शन उरलेली होती. हॉस्पीटलने दिलेल्या इंजेक्शनच्या शिल्लक बाटलीतील औषधाचा रंग तपकिरी झाला होता. तर जिवणे यांच्या नातेवाईकांनी आणलेल्या इंजेक्शनच्या बाटलीतील औषधाचा रंग बदलला नव्हता. याविषयी शंका आल्याने, त्यांनी संबंधीत मायलन कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला असता, तो अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. जिवणे यांनी औषधाच्या सत्यतेविषयी कंपनीला ई-मेल केला असता, सदर औषध बनावट असल्याचे कंपनीने ई-मेलद्वारे स्पष्ट केले.

जिवणे यांनी पाठपुरावा केल्यानंतर १७ जुलै २०२१ रोजी वरिष्ठांच्या आदेशान्वये उदगीर पोलिसांनी भारतीय दंड संहिताचे कलम २७४, २७६, ४२० व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतू कोणालाही अटक न झाल्याने आणि गुह्याची नि:पक्ष चौकशी होत नसल्याने सदर याचिका दाखल करण्यात आली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुहास उरगुंडे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

Panchang 18 February 2026: आजच्या दिवशी श्री विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

SCROLL FOR NEXT