भगीरथ भालके यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून साखर कारखाना सुरू करावा Canva
सोलापूर

भगीरथ भालकेंनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून 'विठ्ठल' सुरू करावा!

भगीरथ भालके यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून साखर कारखाना सुरू करावा

भारत नागणे - सकाळ वृत्तसेवा

कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी संचालक मंडळाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून कारखाना सुरू करावा, असे आवाहन युवराज पाटील यांनी केले.

पंढरपूर (सोलापूर) : गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला (Vitthal Sugar Factory) नव्याने कर्ज देण्यासाठी सर्वच वित्तीय संस्थांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध होण्याचे सर्व मार्ग आता बंद झाले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी मागील काही महिन्यांपूर्वी संचालक मंडळाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून कारखाना सुरू करावा, असे आवाहन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक युवराज पाटील (Yuvraj Patil) यांनी केले आहे. या निमित्ताने संचालक मंडळातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मागील चार दिवसांपूर्वी विठ्ठल कारखान्याच्या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे येथे संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांच्या सोबत झालेल्या चर्चेची माहिती कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार आदी उपस्थित होते.

युवराज पाटील म्हणाले की, विठ्ठल साखर कारखान्यावर कर्जाचा मोठा डोंगर आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्‍यता फारच कमी आहे. तरीही मार्ग काढून कारखाना सुरू करता येईल का, या संदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी कारखाना सुरू व्हावा यासाठी राज्य सहकारी बॅंकेला मदत करण्याची विनंती केली. त्यानुसार बॅंकेने कर्जाचे पुनर्गठन करण्याची तयारी दर्शवली आहे. शिवाय इतर बॅंका व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासही बॅंक तयार झाली आहे. परंतु कारखाना सुरू करण्यासाठी लागणारा 70 ते 80 कोटींचा निधी कसा उपलब्ध करणार, असा प्रश्न शरद पवार यांनी बैठकीत उपस्थित केला होता. त्यावर कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके यांनी ठोस भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित होते. परंतु, ते या संदर्भात काहीच बोलले नाहीत. त्यामुळे कारखाना सुरू होईल का नाही, हे आता भगीरथ भालके यांनीच स्पष्ट करावे.

मागील काही महिन्यांपूर्वी कारखाना सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली होती. त्या वेळी भालके यांनी स्वतःची मालमत्ता गहाण ठेवून इतर वित्तीय संस्थांकडून निधी घेऊन कारखाना सुरू करतो, असे संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीरपणे सांगितले होते. कारखाना सुरू करण्यासंदर्भात भगीरथ भालके यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील अद्याप कारखाना सुरू करण्यासंदर्भात त्यांनी कोणतीच भूमिका स्पष्ट केली नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, भालके यांनी स्वतःची मालमत्ता तारण म्हणून बॅंकेला देऊन कर्ज काढून ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि वाहतूक ठेकेदारांचे पैसे द्यावेत आणि यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू करावा. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची माझी तयारी असल्याचेही युवराज पाटील यांनी या वेळी स्पष्टपणे सांगितले.

भगीरथ भालकेंना खुर्चीचा मोह सोडवत नाही

मागील हंगामात गाळप केलेल्या उसाची एफआरपी थकीत आहे. थकीत एफआरपी दिल्याशिवाय हंगाम सुरू करता येणार नाही. हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना सुद्धा कारखान्यातील अंतर्गत कामे अजूनही ठप्प आहेत. ऊस तोडणीसाठी लागणारी यंत्रणा भरली नाही, ऊस वाहतुकीचे करार केले नाहीत. कारखान्याकडे कोणतीच यंत्रणा नाही. तरीही भगीरथ भालके हे कारखाना सुरू होणार असल्याचे कोणत्या तोंडाने सांगत आहेत, असा सवाल उपस्थित करत, भालकेंना खुर्चीचा मोह सोडवत नाही, असा टोला राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

SCROLL FOR NEXT