Sharad Pawar Sakal
सोलापूर

Sharad Pawar : प्रसारमाध्यमांकडं बातम्या आल्या म्हणजे..; सोलापूरच्या राष्ट्रवादीची भाकरी फिरवण्याला पवारांचा विरोध

प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रवादीसंदर्भात शरद पवारांनी (Sharad Pawar) नुकतीच भाकरी फिरविली.

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर शहराचा अध्यक्ष सध्या तरी बदलला जाणार नाही. बदलाविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही.

सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी भारत जाधव (Bharat Jadhav) हेच कायम राहणार असल्याचे या पक्षाचे हायकमांड तथा सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत सांगितले. दरम्यान, दस्तुरखुद्द पवार यांच्या या स्पष्टीकरणामुळे भारत जाधव यांच्याकडेच अध्यक्षपदाचे सिंहासन कायम राहतानाच, शहराध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.

दरम्यान, प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रवादीसंदर्भात शरद पवारांनी (Sharad Pawar) नुकतीच भाकरी फिरविली. मात्र, सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या भाकरी फिरविण्याला त्यांनी विरोध दर्शवला आहे. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सेक्रेटरी बाळासाहेब मोरे यांनी मुंबईत सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली.

यादरम्यान संवाद साधताना मोरे यांनी सोलापूर शहर अध्यक्षपदाच्या (Solapur City NCP President) बदलाचा विषय पवार यांच्या समोर उपस्थित केला. त्यावर पवार म्हणाले की, सध्या तरी बदलाचा कोणताच विषय नाही. याप्रसंगी, मोरे यांनी शहराध्यक्ष बदलासंबंधी प्रसारमाध्यमांकडे आलेल्या बातम्या पवार यांना दाखविल्या.

त्यावर पवार यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमांकडे बातम्या आल्या म्हणजे शहराध्यक्ष बदलत नसतो अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी सांगतो आहे की, सोलापूर शहराचा अध्यक्ष सध्या तरी बदलला जाणार नाही. बदलाविषयी होत असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नाही असे शेवटी पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Man killed in Texas : अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची पत्नी आणि मुलासमोरच निर्घृण हत्या, कुऱ्हाडीने वार केले अन्...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही, कसं तपासायचं? वाचा...

Nagraj Manjule : 'एका हयातीत शिवाजी महाराजांनी केलेलं काम एका चित्रपटात मांडणं अशक्य'; असं का म्हणाले दिग्दर्शक नागराज मंजुळे?

सायली-अर्जुन देणार गुडन्यूज? ठरलं तर मग मालिकेत भन्नाट ट्वीस्ट! बाळाच्या विचारात सायलीचं अर्जुनसाठी खास पत्र

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

SCROLL FOR NEXT