biometric thumb 
सोलापूर

बायोमेट्रिक हजेरी बंद ! विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र 

तात्या लांडगे

सोलापूर : चीनमधील कोरोना या विषाणूचा प्रसार आता जगभर झाला असून महाराष्ट्रातील पुणे, मुंबईत या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा प्रसार टाळण्याच्या निमित्ताने सर्वच शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी बंदचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या विचाराधीन आहे. तत्पूर्वी, विद्यापीठ अनुदान आयोग व शिक्षण संचालनालयाने सर्व विद्यापीठांमधील बायोमेट्रिक हजेरी अनिश्‍चित कालावधीसाठी बंद ठेवावी, असे आदेश दिले आहेत. 


कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्या विषाणूंचा झपाट्याने प्रसार वाढू लागला आहे. तो प्रसार टाळण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी बंद करून हजेरीच्या नोंदी हजेरीपत्रकावर मॅन्युअली घ्याव्यात, असे पत्र विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने 5 मार्चला तर उच्च शिक्षण विभागाच्या विभागीय सहसंचालकांनी 11 मार्चला विद्यापीठांना आदेश दिले आहेत. तत्पूर्वी, राज्यातील सोलापूरसह अन्य काही महापालिकांसह अन्य शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे. विद्यापीठांमध्ये होणारे सार्वजनिक कार्यक्रमही पुढे ढकलावेत, गरज भासल्यास मास्कचा वापर करावा, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची नियमित काळजी घ्यावी, असे सांगितले आहे. 


हजेरी पुस्तकांवर स्वाक्षरी व परिसरात सीसीटीव्ही 
कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात 15वर पोचली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या शिक्षण विभागाने खबरदारी म्हणून विद्यापीठांमधील बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुढील आदेश होईपर्यंत प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करावी लागणार आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाचा गैरफायदा घेतला जाऊ नये म्हणून त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पाच दिवसांचा आठवडा जाहीर झाल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे आता या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय झाला आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: पालकांनो! 'ORS' बाबत अजूनही बाळगा सतर्कता; डॉक्टरांनी दिला इशारा- योग्य ओळखूनच मुलांना द्या!

Cricketer Dies: धक्कादायक! T20 सामन्यापूर्वी १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने गमावले प्राण, डोक्याला लागलेला चेंडू

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

बघंल कोणीतरी आम्ही नाही जा! सुकन्या मोनेंनी सादर केली ठसकेबाज लावणी, सोशल मीडियावर Video Viral

Vaibhavwadi Rural Hospital : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा, २५ वर्षीय तरूणीचा हकनाक बळी; नातेवाईकांच्या आरोपांमुळे तणाव

SCROLL FOR NEXT