BJP Agitation
BJP Agitation Canva
सोलापूर

जिल्ह्यातील भाजपचे खासदार-आमदार करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण !

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : केंद्र शासन व राज्य शासनामार्फत रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन पुरवठा व कोव्हिड लसींचा (Covid Vaccine) पुरवठा पुणे (Pune) विभागातील जिल्ह्यांना केला जात आहे. पण सोलापूर जिल्ह्याला सापत्न वागणूक देऊन रुग्णांच्या संख्येनुसार इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन, लसींचा पुरवठा होत नाही. याच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे खासदार व आमदार (BJP MP and MLA) गुरुवार, 13 मे रोजी सकाळी साडेअकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण (Agitation) करणार आहेत, अशी माहिती आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांनी दिली. (BJP MPs and MLAs in the district will go on a hunger strike in front of the Collector's office)

12 एप्रिल ते 10 मे 2021 या कालावधीमध्ये पुणे विभागासाठी केंद्र शासन व राज्य शासन यांच्याकडून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, ऑक्‍सिजन व कोव्हिड लस पुरवठा करताना पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यावर वितरणाबाबत अन्याय होत आहे. सोलापूर जिल्ह्याला रुग्णांच्या प्रमाणात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन्स दिली जात नाहीत. ऑक्‍सिजनचा पुरवठा अद्यापही सुरळीत केला जात नाही. कोव्हिड लसही लोकसंख्येच्या प्रमाणात दिली जात नाही. टेस्ट किटचा पुरवठा जिल्ह्याला कमी प्रमाणात केला जातो. याउलट पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यास जास्त प्रमाणात झुकते माप देऊन सोलापूर जिल्ह्याचाही कोटा इतर जिल्ह्यांना दिला जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिड रुग्णसंख्या वाढत असून त्याचा परिणाम जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या मृत्यूदरामध्ये झालेला आहे.

यापूर्वी वेळोवेळी आम्ही प्रशासनामधील संबंधित अधिकाऱ्यांना पाठपुरावा करूनही वरील बाबतीत कोणतीही पूर्तता केली जात नाही. त्यामुळे नाइलाजास्तव आम्ही जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे व भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील सर्वजण मिळून शासनाने गंभीर दखल घ्यावी यासाठी गुरुवार, 13 मे रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.

उपोषणाबाबत आमदार राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT