"वीजबिल म्हणून शेतीमाल स्वीकारा व वीजपुरवठा सुरळीत करा!' Canva
सोलापूर

'वीजबिल म्हणून शेतीमाल स्वीकारा व वीजपुरवठा सुरळीत करा!'

'शेतीमाल वीजबिल म्हणून स्वीकारा व वीजपुरवठा सुरळीत करा!'

नितीन मगर

शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी वेळापूर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भाजीपाला देत भाजपने अनोखे आंदोलन केले.

निमगाव (सोलापूर) : पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यातच महावितरणने (MSEDCL) अचानक वीज कपात केल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी चारही बाजूंनी कोंडीत सापडलाय. वीजबिल भरण्याची इच्छा आहे पण पैसे नाहीत म्हणून जुन्या काळात ज्या पद्धतीने पैशाऐवजी वस्तूमध्ये व्यवहार व्हायचे तसेच आमच्याकडे उपलब्ध असणारा शेतीमाल वीजबिल म्हणून स्वीकारावा व लोडशेडिंग बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी भाजपचे (BJP) जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील (K. K. Patil) यांनी वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली.

माळशिरस तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीजपुरवठा सुरू करण्यासाठी भाजपचे जिल्हा सहप्रभारी के. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील वेळापूर (ता. माळशिरस) येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भाजीपाला देत भाजपने अनोखे आंदोलन केले. या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान नारनवर, ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण माने, बलभीम जाधव, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, जब्बार आतार, विनोद थिटे, अमर मगर, किरण पाटील आदी उपस्थित होते.

के. के. पाटील म्हणाले, की शेतकऱ्यांची वीजबिले भरण्याची इच्छा आहे; परंतु पैसे नाहीत. सध्या शेतीमध्ये जी पिके आहेत त्या पिकांना दर नाही. पिकांवर रोग पडलाय. उसाला हुमनी व लोकरी मावा आहे. डाळिंब बागा तेल्या रोगाने उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. मकेवर अळी व मावेचा प्रादुर्भाव आहे. भाजीपाला मातीमोल दराने विकला जातोय. कोरोनामुळे दुधाला दर नाही. कोरोना व इतर साथीच्या आजाराने शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. पावसाने ओढ दिली असल्यामुळे पिकाला सध्या पाण्याची गरज आहे. त्यातच आपण अचानक लोडशेडिंग केले. त्यामुळे शेतकरी चारही बाजूंनी कोंडीत सापडलाय. वीजबिल भरण्याची इच्छा आहे पण पैसे नाहीत म्हणून ज्या पद्धतीने जुन्या काळात पैशाच्या ऐवजी वस्तूमध्ये व्यवहार व्हायचे तसेच आमच्याकडे उपलब्ध असणारा शेतीमाल वीजबिल म्हणून स्वीकारावा व लोडशेडिंग बंद करून वीजपुरवठा सुरळीत करावा, ही आमची विनंती आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना थोडीशी उसंत द्यावी व शेतकऱ्यांची तोडलेली वीज ताबडतोब जोडावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT