mobile.jpg
mobile.jpg 
सोलापूर

ऑनलाइन लिंक तयार करून त्यांना आणले स्वगृही

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा,(सोलापूूर) : लॉकडाउनमध्ये बाहेरगावी अडकलेल्या तालुक्‍यतील नागरिकांना ऑनलाईन लिंक तयार करून माहिती घेत मंगळवेढा तालुक्‍यात सुरक्षीत आणण्यात आले. या ऑनलाईन लिंकच्या मदतीने 624 लोक त्यांच्या घरी सुरक्षीत पोचले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाउन केले. अशा परिस्थितीत पुणे व मुंबई या ठिकाणी मजुरीसाठी गेलेल्या नागरिकांना घरात अडकून पडावे लागले. अडकलेल्या पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघातील जवळपास 624 नागरिकांना स्वगृही आणण्यासाठी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थिती पाहता शाश्‍वत रोजगाराचे साधन नाही. त्यामुळे नागरिकांना कौटुंबिक उपजीविका करण्यासाठी तालुक्‍याबाहेर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा विविध ठिकाणी स्थलांतर करावे लागले. लॉकडाउन होताच या नागरिकांना परजिल्ह्यात किंवा परराज्यात अडकून पडावे लागले. रोजगाराअभावी कौटुंबिक उपासमार होऊ लागल्याने काय करावे हे समजत नव्हते. 
या सर्वांची माहिती गोळा करताना एक ऑनलाइन लिंक बनवून ती लिंक व्हॉट्‌सऍप व विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यात आली. त्या लिंकचा उपयोग करून तालुक्‍यातील रहीवाशी असलेल्या 624 नागरिकांनी त्यांची माहिती दिली. ही माहिती गोळा झाल्यावर त्या नागरिकांशी फोनद्वारे संवाद साधत त्याच्या अडचणींची माहिती घेतली. त्यानंतर लींकवर नोंद झालेल्या नागरिकांची प्रशासकीय अर्ज दाखल करण्यापासून ते परवाना घेण्याची कामे पुर्ण झाली. त्यानंतर आवश्‍यक त्या तपासण्या व नियमांचे पालन करण्यात आले. त्यांना स्वगृही पोचेपर्यंत सर्व जबाबदारी समाधान अवताडे यांनी घेत ती पार पाडली. त्यामुळे त्या नागरिकांना आपल्या घरी सुखरूप येणे शक्‍य झाले. 

संपर्क साधला तर मदत मिळेल 
लॉकडाउनमुळे अजूनही पंढरपूर, मंगळवेढ्यातील काही नागरिक अथवा नातेवाईक किंवा विद्यार्थी जर कुठे अडकून पडले असतील तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा. त्यांना घरपोच करण्यासाठी मदत करू. 
- समाधान आवताडे, अध्यक्ष, दामाजी साखर कारखाना 

लींकमुळे बोरीवलीतून पोचले 
कामामुळे मी बोरिवलीला राहते. मंत्रालयात कामाला असूनसुद्धा आमची फार गैरसोय झाली. अशातच समाधानदादा आवताडे यांच्याशी लिंकच्या माध्यमातून संपर्क झाला. संकटकाळात गावाकडून कोणीतरी विचारले, हे फार समाधानकारक होते. त्यांच्यामुळे घरी पोचणे शक्‍य झाले. 
- विजया संगशेट्टी, नंदूर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT