Crime 
सोलापूर

"या' गावातील सरपंच पुत्रावर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

श्रावण तीर्थे

कोरवली (सोलापूर) : जामगाव (ता. मोहोळ) येथील सरपंचाचा पुत्र नामदेव मारुती डांगे याच्यावर जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी ऍट्रॉसिटी अंतर्गत कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

याबाबत श्रीकांत मच्छिंद्र गायकवाड (रा. जामगाव, ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीकांत गायकवाड यांची पत्नी कांचन श्रीकांत गायकवाड या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या आहेत. शनिवारी (ता. 22) ग्रामपंचायतीचे शिपाई नन्नवरे हे पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याची दवंडी देण्यासाठी भीमनगर येथे आले असता, श्रीकांत गायकवाड यांनी "आमच्या भीमनगरमध्ये पाणी सोडत नाहीस मग पाणीपट्टी भरा कसे म्हणतोस' असे विचारले होते. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. 23) सकाळी श्रीकांत गायकवाड हे स्वतःच्या घरासमोर उभे राहिले असता सरपंचाचा पुत्र नामदेव डांगे याने "तू काल ग्रामपंचायत शिपायास काय म्हणालास, तुला माज आला आहे का? तुला मी बघतो' असे म्हणून निघून गेला. 

तेव्हा घडला प्रकार श्रीकांत गायकवाड यांनी सरपंच यांच्या कानावर घालण्यासाठी सायंकाळी गावचे सरपंच मारुती श्रीकांत डांगे व आरोपीचा मामा संजय धोंडीबा हाके यांच्याकडे जाऊन सांगत असताना नामदेव मारुती डांगे हा तेथे आला व त्याने श्रीकांत गायकवाड यांच्या शर्टची गच्ची धरून त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून, तुझी काय लायकी आहे, असे म्हणून हातातील लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्या वेळी श्रीकांत गायकवाड यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी तुटून गहाळ झाली आहे, अशा आशयाची फिर्याद कामती पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनेचा पुढील तपास कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाकर शिंदे हे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT