Field 
सोलापूर

"या' तालुक्‍यात पावसाची दमदार हजेरी, मात्र शेतातील तण नष्ट करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान 

राजकुमार शाह

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ तालुक्‍यात बुधवारी सायंकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे शेतकरी आनंदला आहे. हा पाऊस ऊस, मका, भुईमूग, कांदा पिकासह द्राक्ष, डाळिंब, केळी, सीताफळ, बोर या फळबागांना फायदेशीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस व मका लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. शासकीय आकडेवारीनुसार सर्वांत जास्त पाऊस मोहोळ मंडळात 38.2 मिलिमीटर तर सर्वांत कमी पाऊस पेनूर मंडळात 8.1 मिलिमीटर इतका पडला आहे. सरासरी पाऊस 23.68 मिलिमीटर झाला आहे. दरम्यान, चांगल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर तण झाले आहे. हे तण नष्ट करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे. 

बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तालुक्‍यात जोरदार पावसाला सुरवात झाली. याअगोदरही तालुक्‍यात बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. पण पडलेल्या पावसापैकी हा चांगला भीज पाऊस झाला असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. या अगोदर उजनी कालव्याला वेळच्या वेळी पाणी सुटल्याने व पाऊस पडल्याने विहिरीला बऱ्यापैकी पाणी वाढले. त्यामुळे ऊस व मका लागवडी वाढल्या आहेत. मोहोळ तालुका हा मुख्यत्वे रब्बीचा असल्याने खरिपाचे क्षेत्र मर्यादित आहे. कोरोनामुळे व वेळोवेळी होणाऱ्या जनता कर्फ्यू व लॉकडाउनमुळे भाजीपाला लागवडीऐवजी शेतकरी आता ऊस लागवडीकडे वळला आहे. सध्या ऊस लागवडीसाठी लागणाऱ्या बेण्याचा दर प्रतिगुंठा चार ते पाच हजार रुपये असा आहे. तर ऊस लागवडीचा दर प्रतिएकर तीन ते साडेतीन हजार रुपये आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय केला जातो. जनावरांना चारा म्हणून मक्‍याची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. 

भीज पावसामुळे शेतात निरुपयोगी गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते नष्ट करणे शेतकऱ्यांसमोरचे सर्वांत मोठे आव्हान आहे. मशागतीपेक्षा तण नष्ट करण्याच्या व त्यासाठी विविध फवारणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होऊ लागल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काही भागात द्राक्ष बागेचे वलांडे बांधणे, आलेल्या बाळ्या कट करणे आदी कामे सुरू आहेत. 

तालुक्‍यातील पाऊस 
बुधवारी सायंकाळी मोहोळ तालुक्‍यात मंडळनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे : मोहोळ 38.2 मिमी, कामती 35.2, पेनूर 8.1, शेटफळ 10, वाघोली 36, नरखेड 11, सावळेश्वर 18, टाकळी सिकंदर 33 मिमी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT