सोलापूर

कोण म्हणाले, सोलापुरातील बाजारपेठा, उद्योग सुरू करा

सकाळवृत्तसेवा

सोलापूर  : लॉकडाउन चारमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्याच्या प्रधान सचिवांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे सोलापूर शहरातील लॉकडाउनच्या नियमात शिथिलता आणून बाजारपेठा पूर्णवेळ सुरू कराव्यात, तसेच शहर हद्दीतील सर्व उद्योग, बाजारपेठा व कार्यालये सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. 

पालकमंत्री श्री. भरणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी श्री. राठी यांनी शहरातील उद्योग व बाजारपेठा सुरू होणे अत्यावश्‍यक असल्याचे पालकमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले. 
निवेदनात नमूद की 19 मेच्या आदेशानुसार, आता महाराष्ट्रात रेड झोन व उर्वरित क्षेत्र तसेच कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच शासनाने सोलापुरातील रुग्णांची संख्या पाहून सोलापूर शहरचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस आयुक्तालय व महापालिकेकडून दिवसरात्र परिश्रम घेऊन प्रादुर्भाव रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. राज्य शासनाने रेड झोनमधील सर्व दुकाने, बाजारपेठा, मार्केट, कार्यालये आदी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. अत्यावश्‍यक सेवेतर दुकाने सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोलापुरातील जनजीवन सुरळीत तसेच नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व थांबलेले अर्थचक्र रुळावर आणण्याकरिता आर्थिक घडामोडी होणे आवश्‍यक आहे. यातूनच रोजगाराचा प्रश्‍न सुटेल. तरी आपण त्वरित निर्णय घेऊन व्यापार, उद्योग, यंत्रमाग कारखाने, गारमेंट व विडी कारखाने, बाजारपेठा, मार्केट, कार्यालये पूर्ण वेळ सुरू करावीत. आम्ही आपल्या आदेशांचे व नियमांचे काटेकोर पालन करू व पूर्णत: सहकार्य करू, अशी ग्वाही देत आहोत. 

यावर पालकमंत्री श्री. भरणे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी आमदार भारत भालके. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय जाधव, चेंबरचे मानद सचिव धवल शहा, संचालक पेंटप्पा गड्डम, रमेश डाकलिया, रमणिकभाई मोहता, गारमेंट असोसिएशनचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, सचिव राजेंद्र कोचर, संचालक नीलेश शहा, अमित जैन, सहसचिव प्रकाश पवार, प्रफुल्ल वेद आदी उपस्थित होते. 

अग्निशमनच्या आठ गाड्या मंजूर करा
कोरोना महामारी विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात प्रतिबंधक औषधी फवारणीकरिता विशेष स्वतंत्र आठ अग्निशमनदलाच्या गाड्या त्वरित मंजुरी करून उपलब्ध कराव्यात, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली. 

पालकमंत्री श्री. भरणे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहरातील उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी चेंबरचे अध्यक्ष राजू राठी यांनी शहरात जंतुनाशक फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अग्निशमनदलाच्या गाड्यांबाबत श्री. भरणे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. निवेदनात नमूद की शहरात दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत सध्या महापालिकेच्या मर्यादित संख्येने असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांचा वापर केला जात आहे. या फवारणीसाठी सोडियम हायड्रोक्‍लोराईड केमिकलचा वापर केला जातो. परंतु, दुर्दैवाने एखादी आगीची घटना उद्‌भवल्यास मर्यादित संख्येने असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या वापरताना या केमिकल मिश्रित पाण्याचा अंश राहिल्यास काही विपरीत घटना घडणार नाही याबाबत दक्षता बाळगणे आवश्‍यक व गरजेचे आहे.

सध्या सोलापुरात महापालिकेच्या आठ झोनसाठी अगदी मर्यादित म्हणजेच सहा अग्निशमन गाड्या असून, त्यातील तीन गाड्या सोडियम हायड्रोक्‍लोराईड केमिकल मिश्रित पाण्याच्या फवारणीसाठी वापरण्यात येत आहेत. सोलापूरचा जवळपास 75-80 टक्के भाग कोरोनाबाधित असून कंटेन्मेंट झोन घोषित असल्याने सर्वत्र विषाणूचा मोठा फैलाव झालेला आहे. तरी आपत्ती व्यवस्थापन निधीतून किंवा डीपीडीसीमार्फत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र अग्निशमन दलाच्या आठ गाड्या त्वरित उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाचा प्रश्‍न अनिश्‍चित काळापर्यंत भेडसावणार असल्याने शहरात अग्निशमनदलाच्या गाड्या स्वच्छतेच्या दृष्टीने व येणाऱ्या पावसाळ्यात अन्य रोगराई पसरू नये याकरिता महत्त्वाच्या ठरतील. तरी या अत्यावश्‍यक प्रस्तावाबाबत गांभीर्याने, व्यवहारिक दृष्टीने विचार व्हावा. महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT