solapur  sakal
सोलापूर

Child Care : मोबाईलचे रील नको आजी-आजोबांच्या गोष्टीच हव्या ; नातवंडांना सुरक्षित सहवास

आजच्या काळात नोकरीनिमित्ताने आई-बाबा दूर गावी राहात असल्याने नातवंडांना आजी-आजोबांचा सहवास कमी मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - तंत्रज्ञानाच्या विश्वात लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या हातात मोबाईल दिसतो. त्यातील ‘रिल’ संस्कृती फोफावत चालली आहे. त्यामुळे समाज बदलत चालला आहे किंबहुना बिघडत चालला आहे अशा प्रतिक्रिया समाजातूनच येतात. मात्र हे बदलून येणारी पिढी संस्कारक्षम घडवायची असेल तर हातातील मोबाईल बाजुला ठेवून त्या हातात आजी-आजोबांचा हात येणे गरजेचे बनले आहे.

आजच्या काळात नोकरीनिमित्ताने आई-बाबा दूर गावी राहात असल्याने नातवंडांना आजी-आजोबांचा सहवास कमी मिळत आहे. अनेक ठिकाणी तर सासू-सुनांच्या भांडणांमुळे आजी-आजोबा नातवंडांजवळ नसतातच. आजी-आजोबांचा सहवास नसल्याने मुले एकलकोंडी होतात. नोकरीवरून दमून येणार आई-बाबा त्यांच्यासमवेत खेळू शकत नाहीत.

त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या विश्वात रमायला कंटाळतात. पर्यायाने आई-बाबाच लहान मुलांच्या हाती मोबाईल देतात. आमचा मुलगा मोबाईल दिला की शांत राहतो अन्यथा तासंतास रडतो अशा प्रतिक्रिया देणारे आई-बाबा आता सर्वत्र आढळून येत आहेत. खरतर अशा वेळी आजी-आजोबांची सोबत ही नातवंडांची नितांत गरज असते. दिवसभर सोबत असणारे आजी-आजोबा हे नातवंडांसाठी जगण्याचा आनंद असतात. जीवनाला दिशा दाखवणारे मार्गदर्शक असतात. हसत खेळत गोष्टी सांगून आपसूक संस्कार घडविणारी शाळाही असतात.

मोबाईल हातातून काढून घेतला म्हणून दहा वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याच्या घटनाही आपण ऐकतो. मुळात दहा वर्षांच्या मुलाला आत्महत्या हे सांगितले कोणी? तर त्याचे उत्तरही मोबाईल किंवा टिव्ही असेच द्यावे लागेल. दुर्दैवाने टीव्ही किंवा मोबाईलवर काय पाहावे किती वेळ पाहावे हे सांगणारेही घरात कोणी ज्येष्ठ आजकाल दिसत नाहीत.

माढा तालुक्यातील केदार वस्तीतील एका जिल्हा परिषद शाळेचे उदाहरण पाहिले तर लक्षात येईल की आजी-आजोबांशिवाय मुले कशी उदास असतात. शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका प्रतिभा सुभाष नवले यांनी सर्व मुलांना दररोज आजी-आजोबा, आई-बाबांना नमस्कार करून यायला सांगितले. अशी सूचना मिळताच वर्गातील एक मुलगा रडायला लागला.

माझे आजी-आजोबा गावातच दुसरीकडे जातात. त्यांच्याकडे आई-बाबा मला जाऊ देत नाहीत ही त्याची तक्रार होती. प्रतिभा नवले यांनी त्या मुलाला सांगितले की आई-बाबांना दररोज विचार की आजी-आजोबांना नमस्कार करायला जाऊ का? त्याचा परिणाम असा झाला की चौथ्या दिवशी त्याला परवानगी मिळाली. तो आजी-आजोबांच्या घरी गेला आणि नमस्कार करताच आजोबांनी त्याला मिठी मारली. पर्यायाने त्या दोन्ही घरातील दुरावाही आता कमी झालाय.

मोबाईल उपवास

केदारवाडी शाळेचा आणखी एक चांगला उपक्रम म्हणजे मुलांनी दररोज सायंकाळी ७ ते ९ हे दोन तास मोबाइल बंद करून आजी-आजोबांसोबत वेळ घालवायचा. तसेच आठवड्यातून दोन दिवस घरातील कुणीही मोबाईल वापरायचा नाही. यामुळे घरांतील ज्येष्ठ मंडळींशी संवाद वाढीस लागण्यास मदत होत आहे.

आजी-आजोबांमुळेच नम्रता

आजी-आजोबा नम्रता शिकवतात तर मोबाईलमुळे लहान मुलांमध्ये ‘इगो’ निर्माण होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुले क्रूर होण्याची शक्यताही निर्माण होते. ते स्वतःच्या किंवा इतरांच्या जीवाला धोका पोचवतात. हे टाळण्याचे काम घरातील आजी-आजोबा संस्काराद्वारे व समजूत काढून करू शकतात.

शाळेत दहा सप्टेंबरला एक दिवस आजी-आजोबांसोबत उपक्रम घेतला. आजी-आजोबाही शाळेत आल्याने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. नातवंडांची प्रगती पाहून कौतुक करताना आजी-आजोबांचेही डोळे भरून आले होते. नातवंडांना आई-बाबांपेक्षाही आजी-आजोबांसोबत जास्त सुरक्षित वाटते.

प्रतिभा नवले, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, केदार वस्ती, ता. माढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Chairman Apology Video : आता ‘इंडिगो’च्या अध्यक्षांचाही माफीनामा ; ‘CEO’नी आधीच सरकारसमोर जोडले होते हात!

Eknath Khadse : भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना मोठा धक्का; दोषमुक्ती अर्ज न्यायालयाने नाकारला!

Pune IT Company employee News : ‘कॅन्सर’ झाला म्हणून कर्मचाऱ्याला कामावरुनच काढलं? ; पुण्यातील प्रसिद्ध 'IT' कंपनीतील प्रकार

Akola News : अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावर विधानसभेत तीव्र संताप; सेंट अ‍ॅन्स शाळेची मान्यता रद्द करण्याची आ. रणधीर सावरकर यांची मागणी!

एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना! राज्यात, परराज्यातील प्रवासासाठी कमी केले २०० ते ८०० रुपयांनी सवलतीच्या पासची रक्कम, जाणून घ्या दर...

SCROLL FOR NEXT