बालविवाह
बालविवाह Media Gallery
सोलापूर

मुलीला व्हायचंय पोलिस ! पालकांनी पहाटे विवाह उरकण्याचा काढला मुहूर्त

तात्या लांडगे

मुलीचे वय 16 तर मुलाचे वय 28 असतानाही पालकांनी विवाह ठरवला. शाळा बंद असल्याने मुलगी शिक्षण घेत असतानाही पहाटे पाच वाजता विवाह उरकला जाणार होता.

सोलापूर : "मला शिकायची इच्छा असून पुढे पोलिस दलात जायचे माझे स्वप्न आहे. पण, माझ्या पालकांच्या आग्रहामुळे माझा विवाह जमविण्यात आला' असे सांगणारी मुलगी अक्‍कलकोट तालुक्‍यातील असून, तिचा शुक्रवारी (ता. 28) पहाटे पाच वाजताच विवाह उरकण्याचे नियोजन पालकांनी केले. मात्र, मुलीचे वय 16 असल्याने अक्कलकोट पोलिस (Akkalkot Police) आणि बाल विकास अधिकाऱ्यांनी (Child Development Officers) तो बालविवाह (Child Marriage) रोखला. (Child marriage in Akkalkot taluka was stopped)

राज्यातील कोरोनाचे (Covid-19) संकट मागील 14 महिन्यांपासून कायम असून, वारंवार लॉकडाउन (Lockdown) केला जात आहे. त्यातच शाळा- महाविद्यालये बंद असून वयात आलेली मुलगी घरात बसून आहे. ती मुलगी शिक्षण घेत असून तिची शिकण्याची इच्छा आहे. मला एवढ्यात विवाह करायचा नाही, परंतु पालकांनी जास्त आग्रह केल्याने मला त्यांची मागणी मान्य करावी लागली, असे त्या मुलीने बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी (Child Welfare Committee Chairperson Anuja Kulkarni) यांना सांगितले.

तत्पूर्वी, अक्‍कलकोट तालुक्‍यातील एका गावात बालविवाह होणार असल्याची माहिती महिला बाल विकास अधिकाऱ्यांना समजली. त्यांनी तत्काळ अक्‍कलकोट ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची सूचना केली. त्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी पहाटे चार वाजता त्या गावाच्या दिशेने प्रवास सुरू केला. पहाटे पाच वाजता होणारा हा विवाह रोखण्यात त्यांना यश आले. मुलीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या मदतीने तिला बालगृहात पाठविण्यात आले. ही कारवाई बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री. अल्लडवाड यांच्या उपस्थितीत झाली. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, परिविक्षा अधिकारी दीपक धायगुडे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, प्रभारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

ठळक बाबी...

  • मुलीची शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही शाळा बंद असल्याने पालकांनी ठरवला तिचा विवाह

  • वर मुलाचे वय 28 असून त्याच्या कुटुंबीयांची शेती आहे. मुलाचे पूर्ण झाले आहे शिक्षण

  • शुक्रवारी (ता. 28) पहाटे सहा वाजता विवाह उरकण्याचे दोन्ही कुटुंबीयांचे होते नियोजन

  • लॉकडाउनमध्ये स्वस्तात विवाह होतो, मुलाच्या कुटुंबीयांनी मागितला नाही हुंडा अन्‌ शिक्षणही बंद असल्याने ठरवला होता विवाह

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT