Kovid Center 
सोलापूर

माळशिरस येथे कोव्हिड सेंटर उभारण्यास नागरिकांचा विरोध; काय आहे कारण? वाचा सविस्तर... 

गहिनीनाथ वाघंबरे

माळशिरस (सोलापूर) : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हिड सेंटर उभारण्याचा घाट काही शासकीय अधिकाऱ्यांनी घातला असल्याचे समजते. ग्रामीण रुग्णालंयाची इमारत सुसज्ज असून सर्व सुविधांनी युक्त आहे. सुसज्ज व हवेशीर इमारत हे या रुग्णालयाचे वैशिष्ट्य आहे. तहान लागल्यानंतर पाण्याचा शोध घ्यायचा, ही शासनाची परंपरा असल्याने ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छ, सुसज्ज व हवेशीर इमारत पाहून याच इमारतीत कोव्हिड सेंटर उभे करावे, असे शासकीय अधिकाऱ्यांना मनोमन वाटत आहे. परंतु, या ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड सेंटर उभे करण्यास नागरिकांच्या वतीने माळशिरस नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब देशमुख व भाजपचे कार्यकर्ते बाळासाहेब सरगर यांनी विरोध केला आहे. 

येथे बाह्यरुग्णांची दररोज 200 ते 250 पर्यंत संख्या असते. या रुग्णालयात रुग्णांसाठी 24 तास अत्यावश्‍यक सेवा व 24 तास शवविच्छेदन करण्याची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांवर उपचार करण्याकरिता स्त्री-पुरुषांना स्वच्छतागृहासह स्वतंत्र कक्ष आहेत. या कक्षात ऑक्‍सिजनची सुविधा उपलब्ध आहे. श्वानदंश, सर्पदंश यासाठी आवश्‍यक असणाऱ्या इंजेक्‍शनची सुविधाही उपलब्ध आहे. एक्‍स-रे मशिन, टीबी रुग्णांची थुंकी तपासण्याची स्वतंत्र सोय, स्वतंत्र नेत्र तपासणी कक्ष असून या रुग्णालयात नेत्र तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी परगावी पाठवण्याची सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, रक्त, लघवी, थुंकी तपासण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, गरोदर मातांसाठी स्वतंत्र प्रसूती कक्ष, हिरकणी कक्ष, शवविच्छेदनासाठी स्वतंत्र कक्ष आदी सुविधा या रुग्णालयात उपलब्ध असून, त्या रुग्णांना मोफत दिल्या जातात. 

शासकीय अधिकाऱ्यांच्या कल्पनेनुसार या सुविधा रुग्णांना मिळण्याचे बंद झाल्या तर सर्वसामान्य रुग्णांचे हाल होणार आहेत. या सुविधांसाठी रुग्णांना जवळच्या शहरात भली मोठी फी देऊन उपचार घ्यावे लागणार आहेत. 
या शहरात शासनाच्या अनेक इमारती धूळखात पडल्या आहेत. त्यांचा उपयोग कोव्हिड सेंटरसाठी करावा व ग्रामीण रुग्णालयातील सुरू असलेले आरोग्यसेवेचे कार्य असेच चालू ठेवावे, अशी इच्छा येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT