Congress Agitation Canva
सोलापूर

इंधन, खाद्यतेल दरवाढीच्या निषेधार्थ महिला कॉंग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन !

इंधन, खाद्यतेल दरवाढीच्या निषेधार्थ महिला कॉंग्रेसचे बोंबाबोंब आंदोलन !

श्रीनिवास दुध्याल

जीवघेण्या महागाईच्या विरोधात सोलापूर शहर- जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या विरुद्ध बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

सोलापूर : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या (BJP) चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्‍यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्‍किल झाले आहे. या जीवघेण्या महागाईच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे (Maharashtra Pradesh Mahila Congress President Sandhya Savvalakhe) यांच्या आदेशानुसार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Former Union Home Minister Sushilkumar Shinde) आणि आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde), शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर शहर- जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील मोदी सरकारच्या विरुद्ध बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. (City and Women's Congress agitation against fuel, edible oil price hike)

केंद्रातील मोदी सरकारवर (Modi government) आगपाखड करताना सोलापूर शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर म्हणाल्या, आधीच पेट्रोल- डिझेल व इतर जीवनावश्‍यक वस्तूंच्या सतत केलेल्या दरवाढीमुळे सामान्य माणसाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. या परिस्थितीचा सामना करत असताना केंद्रातील मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये भरमसाठ दरवाढ केल्याने महिला वर्गास सातत्याने तीव्र त्रास भोगावा लागत आहे. अगोदरच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे महिला बचत गट, लहान- मोठे उद्योग- व्यवसाय, कारखाने बंद पडल्यामुळे महिला व युवकांमध्ये बेकारी आली आहे.

20 एप्रिल 2020 पासून केंद्र सरकारने गॅस सिलिंडरची सबसिडी बंद केल्यामुळे नाइलाजास्तव विनाअनुदानित गॅस सिलिंडर घेणे अत्यावश्‍यक झाले आहे. महिन्याच्या सुरवातीलाच घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपये 50 पैशाची दरवाढ करून सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. आजच्या घडीला घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीने 850ची मजल मारली आहे. पूर्वीच्या केंद्रामध्ये असलेल्या कॉंग्रेसच्या राजवटीत सर्वसामान्यांना परवडणारा गॅस सिलिंडर 400 रुपयांमध्ये उपलब्ध होत होता व त्याचे दर स्थिर राहावेत म्हणून कॉंग्रेस सरकारचे नियंत्रण होते. याउलट केंद्रातील मोदी सरकारच्या महागाईचा भस्मासुर करून मनमानी कारभारामुळे महिला वर्गामध्ये तीव्र असंतोषाची लाट पसरली आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे मुश्‍किल झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त झाली आहे. त्यात महागाईचा भार सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तरी मोदी सरकार गप्पच आहे. त्यांनी गेंड्याची कातडी पांघरली आहे. त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी असून गृहिणी मेटाकुटीस आल्या आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरची भाववाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी सोलापूर शहर- जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली; अन्यथा महिला कॉंग्रेसने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला व जाहीर निषेध व्यक्त करत महिला कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या नावाने घोषणाबाजी करत बोंबाबोंब करून परिसर दणाणून सोडला. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन व त्यासोबत पंतप्रधानांना पाठविण्यासाठी शेणाच्या गोवऱ्या देण्यात आल्या.

या अंदोलनात शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, माजी महापौर अलका राठोड, अंबादास गुंत्तीकोंड, प्रसिद्धिप्रमुख तिरुपती परकीपंडला, एन. के. क्षीरसागर, सोपान थोरात, नालवार अच्चुगटला, महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, विमल जाधव, वीणा देवकते, शोभा बोबे, नंदा कांगरे, अंजली मंगोडेकर, शुभांगी लिंगराज, लता गुंगला, जगदेवी कदम, सुनीता होटकर, चंदा काळे, बसंती साळुंके, मुनेराबी शेख, मुमताज तांबोळी, नीता बनसोडे, मीना गायकवाड, अनिता भालेराव, यास्मिन शेख, हालिमा शेख, कल्पना वैनूर, माया गायकवाड आदींसह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

India vs Pakistan पुन्हा भिडणार, १६ तारखेला हायव्होल्टेज सामना; वैभव सूर्यवंशी शेजाऱ्यांची वाट लावणार, जितेश शर्माकडे कर्णधारपद

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

SCROLL FOR NEXT