IMA logo.jpg 
सोलापूर

केंद्र शासनाच्या अधिसूचनेच्या विरोधात आयएमए कडून शुक्रवारी बंद 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः येथील इंडियन मेडिकल असोसिएशनने सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेविरुद्ध लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात शुक्रवारी (ता. 11) रोजी वैद्यकीय सेवा बंदचे आवाहन केले आहे. 


या सूचनेत एकूण शस्त्रक्रिया कार्यपद्धती, जनरल सर्जरी, युरालॉजी (मूत्ररोग शस्त्रक्रिया), सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजी ( पोटाच्या आणि आतड्याच्या शस्त्रक्रिया) इ.एन.टी. (नाक-कान-घसा), ऑप्थॅल्मोलॉजी (नेत्ररोग शस्त्रक्रिया) आणि डेंटिस्ट्री (दंतरोग शास्त्रक्रिया) यांचा समावेश आहे. सीसीआयएमने या सर्व शस्त्रक्रिया आयुर्वेदातील शल्यतंत्र आणि शालाक्‍यतंत्र' नावाखाली असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत. या आयुर्वेद विद्यार्थ्यांना या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण देऊन त्याचा वापर भारतातील रुग्णांवर स्वतंत्रपणे करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यानंतर जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार आणि स्पष्टीकरणामुसार सीसीआयएम अशास्त्रीय दावा करीत आहे की, या शस्त्रक्रिया आधुनिक वैद्यकातील (ऍलोपेथिक) नसून आयुर्वेदिक आहेत. 

सीसीआयएमची ही अधिसूचना आयुर्वेदामधील शाल्य आणि शालाक्‍य या पदव्युत्तर उच्चशिक्षणाशी संबंधित आहे. या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण दिल्यावरच या शस्त्रक्रिया स्वतंत्रपणे करता येतील. त्याचबरोबर त्यांना या शस्त्रक्रिया वगळता इतर कोणत्याही शस्त्रक्रिया करता येणार नाहीत. सीसीआयएम प्रमुखांनी भारतातील आयसीयूपैकी टक्के आयसीयू आयुर्वेदिक डॉक्‍टर्स चालवतात असे चुकीचे आणि गैरसमज पसरवणारे मत प्रसिध्द केले आहे, असा आक्षम इंडियन मेडिकल असोशिएशनने घेतला आहे. आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसुतिगृहे व आपतकालीन शस्त्रक्रिया सेवा सुरू राहतील, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. हरिष रायचूर यांनी सांगितले. 

या आहेत मागण्या 

सीसीआयएमने या सर्जिकल प्रक्रियेबद्दलची सूचना मागे घ्यावी. मिक्‍सोपॅथीला प्रोत्साहन देण्याच्या विचारात असलेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सर्व चार समित्या बरखास्त कराव्यात. केंद्र सरकारने सर्व वैद्यकीय शाखांमध्ये आणि प्रकारामध्ये संशोधन कार्याला प्रोत्साहन द्यावे या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यासाठी शुक्रवारी (ता.11) रोजी सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येतील.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadodara-Mumbai: वडोदरा–मुंबई द्रुतगती महामार्गाला बंदराशी थेट जोड! १४ किमीचा नवीन रस्ता बांधणार; पण कुठे? पाहा मार्ग

मोठा निर्णय! वाहनांमध्ये GPS सक्तीचे; मार्ग बदलला तर कारवाई होणार, राज्य सरकारचा मोठी घोषणा

Madhuri Elephant Latest Update : अखेर शिक्कामोर्तब! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; हाय पावर कमिटीकडून वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यास परवानगी

कधी सुरू झाला कधी संपला समजलंच नाही! झी मराठीच्या 'या' मालिकेने अचानक घेतला निरोप; प्रेक्षकही चकीत

Chh. Sambhaji Nagar News : कन्नड तालुक्यात ६६१ शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण; शासकीय मका खरेदीचा मुहूर्त मात्र रखडलेला!

SCROLL FOR NEXT