industry.jpg 
सोलापूर

दिलासादायक : काम सोडून गेलेले परप्रांतीय कामगार आता परतीच्या मार्गावर !

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः जिल्हाभरातून बांधकाम, दालमिल, हॉटेल्स व इतर अनेक प्रकारच्या कामावर असलेल्या परप्रांतीय कामगारांना त्यांच्या मुळगावावरून संबधित राज्याकडून कामासाठी परत महाराष्ट्रात जाण्याची परवानगी मिळत आहे. त्यामुळे या कामगारांना कामावर परत आणण्यासाठी उद्योजक व व्यावसायिकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

मागील तीन महिन्यापासून जिल्हाभरातील परप्रांतीय कामगार त्यांच्या मुळ गावी परत गेले आहेत. प्रशासनाने या कामगारांची परतीच्या प्रवासासाठी केलेली नोंदणी आठ ते नऊ हजार एवढी होती. तसेच खासगी वाहनाने व पायी गेलेल्या मजुरांची संख्या देखील मोठी आहे. हे सर्व मजुर केळी काढणी, बांधकाम, हॉटेल, केशकर्तनालय, दालमिल, कारखाने व उद्योग यामध्ये मोठ्या संख्येने काम करत होते. 

या मजुरांच्या आधारावर उद्योग व व्यवसायाला लागणाऱ्या मनुष्यबळाची गरज भागते. कुशल व अकुशल या दोन्ही प्रकारच्या कामगारांचा यामध्ये समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने कष्टकारी कामगार उपलब्धच होत नसल्याने उद्योजक व व्यावसायिक सर्वस्वी या कामगारावर अवलंबुन आहेत. लॉकडाउनचा काळ आता 31 जुलै रोजी संपत आहे. त्यानंतर सर्वच उद्योजक व व्यावसायिक पुन्हा सर्व निर्मिती व सेवा सुरू होतील यासाठी तयारीत लागले आहेत. 
त्यासाठी उद्योजक व व्यावसायिकांनी या कामगारांशी संपर्क साधला आहे. तेव्हा या कामगारांनी त्यांच्या गावाच्या स्थानिक प्रशासनाकडून कामाच्या गावी जाण्यास कोणतीही अडचण नाही. झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशातील कामगार ही भूमिका मांडत आहेत. ज्या भागात रेल्वेची सोय आहे तेथून हे कामगारांना रेल्वेने येण्याची सुचना उद्योजकांनी केली आहे. तसेच ज्या भागात रेल्वेची सोय नाही तेथे अडचणी आहेत. त्यासाठी महाराष्ट्रातून खासगी वाहने पाठवावी लागणार आहे. पण खासगी वाहनांना परवानगी मिळण्याच्या अडचणी आहेत. त्याबाबत स्थानिक प्रशासनाने कामगारांना कामावर आणण्याबाबत उद्योजक व व्यावसायिकांसोबत समन्वयाची भूमिका घेतली तर ही प्रक्रीया सुरळीत होणार आहे. या कामगारांना चौदा दिवसासाठी होम क्वारंटाईन करावे लागणार असल्याने ही प्रक्रिया आता सुरू केली तर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर कामगार त्यांचे काम सुरू करू शकतील. 

आता कामगार कामावर यावेत 
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या कामगारांना परत कामावर येण्यास कोणतीच अडचण नसेल हे धोरण स्पष्ट केले आहे. मात्र आवश्‍यक ती तपासणी व कागदपत्रे सोबत असणे आवश्‍यक आहे. उद्योजकांना त्यांच्या कामावरील कामगारांना आणण्यासाठी वाहनाची सोय करता येईल.  
- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स सोलापूर. 

दालमिलचा हंगाम सुरू करणे आवश्‍यक 
मुग व उडीदाचे पीक अगदी काढणीच्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे तातडीने दालमिलचा हंगाम सूरू करावा लागणार आहे. दालमिल उद्योगात मोठ्या प्रमाणात परप्रांतातील कामगार काम करतात. त्यांना तातडीने कामावर आणले तर दाळीचे उत्पादन सुरू होऊ शकणार आहे. 
- मनोज भुतडा, दालमिल उद्योजक.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

पावसाने रोखला गणेशभक्तांचा मार्ग! शनिवारच्या रात्रीत ६ हजार वाहनांचा प्रवास; रविवारी राहणार सर्वाधिक रहदारी

Sangli Ganpati: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! बबलूनंतर आसाममधून येणार नवा हत्ती; गणपती संस्थानचा वैभवशाली थाट कायम राहणार

Marathi News Live Updates : पेपरफुटीला कायमचा आळा घालण्यासाठी झिरो लीक सिस्टीम; परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल, ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करून ऑनलाइन वितरणाचा प्रस्ताव

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट; पुढील दोन दिवसांत निर्णयाची शक्यता, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT