Solapur Smart City
Solapur Smart City 
सोलापूर

स्मार्ट सिटीसाठी "क्रिसील'चा सल्ला बंद ! आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अहवालानंतर थांबविली सेवा 

प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटीतील 51 प्रकल्पांना सल्ला देणाऱ्या क्रिसील कंपनीची सेवा थांबविण्यात आली आहे. 3 जानेवारीपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे क्रिसीलची सेवा बंद झाली आहे. गेल्या साडेचार वर्षांत क्रिसीलसह इतर कंपन्यांनी 34 कोटी रुपयांचा सल्ला स्मार्ट सिटीच्या कामांसाठी दिला आहे. 

प्रकल्पांचे डिझाईन, रेकॉर्ड ठेवणे, एमबी तयार करणे, निविदा प्रक्रिया राबविणे, ठेकेदारांच्या इतर कामांवर नियंत्रण ठेवणे ही जबाबदारी क्रिसीलवर होती. क्रिसीलच्या हाताखाली दोन कंपन्यांच्या माध्यमातून ही कामे पार पाडली जात होती. तत्कालीन आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांच्या काळात या कंपनीची नियुक्ती झाली होती. मधल्या काळात महापालिकेची यंत्रणा व अपुरे मनुष्यबळ, कोरोनाचे संकट यामुळे स्मार्ट सिटीतील कामांचा वेग मंदावला होता. स्मार्ट सिटीत किती काम झाले अथवा नाही झाले तरीही क्रिसील व अन्य कंपन्यांना कन्सल्टन्सी फी म्हणून ठराविक रक्कम अदा करावी लागत होती. 

या कंपनीला दरमहा ठराविक रक्कम अदा करण्याची अट होती. कोव्हिडमध्ये काम थांबलेले असतानाही या कंपनीला रक्कम अदा करण्यात आली आहे. या कंपनीच्या बाबतीत केंद्राच्या सचिवांना अहवाल पाठविण्यात आला. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळातही या कंपनीची सेवा थांबविण्याचा निर्णय झाला. या कंपनीच्या अंतर्गत आणखी कंपन्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. त्यामुळे क्रिसीलची सेवा थांबविल्याने स्मार्ट सिटीच्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही. 
- पी. शिवशंकर, 
आयुक्त, महापालिका 

स्मार्ट सिटीतील 51 प्रकल्पांसाठी सल्ला देणे, कामांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या कंपनीकडे होती. यातील बहुतांश प्रकल्प पूर्ण झाले आहेत. कंपनीची सेवा बंद केल्याने तांत्रिक अडचणी येतील, परिणामी सध्या सुरू असलेल्या कामांचा वेगही मंदावू शकतो. मी पूर्वी महापालिकेत असताना स्मार्ट सिटीतील बहुतांश कामांची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे याबाबतची मला पुरेशी माहिती आहे. स्मार्ट सिटीतील कामांचा वेग असाच कायम राहावा यासाठी आमचा प्रयत्न राहील. 
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, 
सीईओ, स्मार्ट सिटी 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT