Dr. Dhawalsinh Mohite Patil
Dr. Dhawalsinh Mohite Patil esakal
सोलापूर

"राजकारणात माणसं कमविण्यासाठी आलोय, पद नशिबाने मिळेल"

प्रमोद बोडके -सकाळ वृत्तसेवा

कॉंग्रेसला भारतीय संस्कृती आहे. कॉंग्रेसमध्ये सर्वांना संधी मिळते. ज्या कार्यकर्त्यांमध्ये कर्तृत्व आहे, त्याला कॉंग्रेसमध्ये उत्तम संधी मिळत असल्याचेही जिल्हाध्यक्ष डॉ. मोहिते- पाटील यांनी सांगितले.

सोलापूर: राजकारणात काम करताना आमदारकी, खासदारकी, मंत्रीपद हे नशिबाने मिळत राहते. माझे आजोबा व वडिलांवर जिल्ह्यातील जनतेने भरभरून प्रेम केले आहे. आजोबांनी कमावलेली माणसं माझ्या वडिलांनी टिकविली म्हणून त्या माणसांचे प्रेम आजही मला मिळत आहे. पद हे क्षणिक असते. आयुष्यात कमावलेली माणसं पिढ्यानपिढ्या टिकतात. राजकारणात मी माणसं कमविण्यासाठी आलोय, पदंही नशिबानं मिळत जातील, असे उद्‌गार कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी काढले. "कॉफी विथ सकाळ'मध्ये ते बोलत होते. यावेळी माजी आमदार ऍड. रामहरी रुपनवर, बसवराज बगले, अभिराज शिंदे उपस्थित होते. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले.

जेथे संघर्ष तेथेच संधी

कॉंग्रेसमध्ये सध्या प्रचंड काम करण्याची आवश्‍यकता आहे. कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे. ज्याठिकाणी आव्हाने असतात, ज्याठिकाणी संघर्ष करावा लागतो, त्याचठिकाणी संधी मिळते. माझ्या आजोबांनी व वडिलांनी कष्टातून, संघर्षातून साम्राज्य उभे केले आहे. कॉंग्रेसला भारतीय संस्कृती आहे. कॉंग्रेसमध्ये सर्वांना संधी मिळते. ज्या कार्यकर्त्यांमध्ये कर्तृत्व आहे, त्याला कॉंग्रेसमध्ये उत्तम संधी मिळत असल्याचेही जिल्हाध्यक्ष डॉ. मोहिते- पाटील यांनी सांगितले.

पक्षाचे चिन्ह रुजणे महत्त्वाचे

पक्षाचे चिन्ह जोपर्यंत गावागावात, घराघरात पोहोचत नाही, तोपर्यंत पक्षाची ताकद वाढत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या स्वतंत्रपणे लढविल्यास कार्यकर्त्यांना संधी मिळते. पक्ष तळागाळापर्यंत रुजण्यास मदत होते. आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याची भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली आहे. या भूमिकेचे आम्ही स्वागतच करत असल्याचे डॉ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.

पप्पा म्हणजे दिलेला शब्द पाळणारे

विरोधक जरी आपल्याकडे आला आणि त्याने आपल्याला मदत मागितली तर त्याला आपण मदत केली पाहिजे. ते ज्या अपेक्षेने आपल्याकडे येतात, आपल्याकडे आल्यानंतर काम होईल, असा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो, तीच आपली खरी ताकद आहे. राजकारणात, समाजकारणात काम करताना एखाद्याला दिलेला शब्द पाळणे हा पप्पासाहेबांचा (कै. प्रतापसिंह मोहिते- पाटील) गुण आपल्याला खूप आवडतो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे डॉ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.

राजीनामा दिल्यानंतर हकालपट्टी कशी?

शिवसेनेत सहसंपर्कप्रमुख म्हणून मी मनमोकळेपणाने काम करू शकत नव्हतो. त्यामुळे मी स्वतःहून या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे दिला होता. राजीनामा दिल्यानंतर दरम्यानच्या काळात मी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. कोणीतरी ही माहिती शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना सांगितली. त्यानंतर माझ्या हकालपट्टीची बातमी मला वर्तमानपत्रातूनच वाचायला मिळाली. मी पवार यांना का भेटलो? हे विचारण्यापूर्वीच माझ्या हकालपट्टीची बातमी येत असेल, एखाद्या पक्षात जर न विचारताच कारवाई होत असेल तर त्याबद्दल अधिक विचारणा करण्यात काहीच अर्थ नसल्याचेही डॉ. मोहिते-पाटील यांनी सांगितले.

बिबट्याची शिकार अवघडच

जिल्हाध्यक्ष पद मिळवताना अनेकजण माझ्यासोबत होते. त्यामुळे जिल्हाध्यक्षपद मला सहज मिळवता आले. करमाळा तालुक्‍यातील नरभक्षक बिबट्याची शिकार करताना मात्र माझा कमालीचा कस लागला होता. माझ्या जीवावर ही शिकार बेतली असती. वांगी भागातील मोहिते-पाटलांवर प्रेम करणारे काही लोक आम्हाला येऊन भेटले. नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्याची त्यांनी मागणी केली. बिबट्या कशाप्रकारे हल्ला करतो, तो कोणत्या भागात राहतो, कधी येतो आणि कधी जातो यासह सर्वच गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला. बिबट्याच्या शिकारीचा थरारक अनुभवही डॉ. मोहिते-पाटील यांनी यावेळी सांगितला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT