Dudhe 
सोलापूर

गवंड्याच्या मुलाने वडिलांच्या कष्टाचे चीज केले; सीबीएसईच्या बारावी परीक्षेत "या' जिल्ह्यात पहिला आला! 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : पांडे (ता. करमाळा) येथील गवंडी काम करणाऱ्या रामचंद्र दुधे यांचा मुलगा महेश दुधे हा सीबीएसईच्या बारावी बोर्ड परीक्षेत 94.60 टक्के गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम आला. त्याला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे. 

सुटीला आल्यानंतर अनेक वेळा वडिलांबरोबर जाऊन बिगारी काम करणारा महेश आज सीबीएसईच्या बारावी परीक्षेत 94.60 टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिला आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. महेशचे इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पांडे येथे झाले आहे. त्यानंतर इयत्ता सहावीसाठी त्याची नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे निवड झाली. घरची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन महेशने चिकाटीने अभ्यास केला व हे यश मिळवले आहे. 

पांडे येथील रामचंद्र दुधे यांना कसलीही जमीन नाही. त्यामुळे त्यांचे रोजंदारी गवंडी कामावरच चालते. त्यांची पत्नी तुळसाबाई या देखील मोलमजुरी करतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले पाहिजे, या भूमिकेतून ते कष्ट करत राहतात मुलगी बीएस्सीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. 

वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून यापुढेही शिकणार
याबाबत महेश म्हणाला, नवोदय विद्यालयात शिकत असताना आपले आईवडील आपल्यासाठी खूप कष्ट करतात याची जाणीव ठेवून सहावीपासून अभ्यास करत आहे. मी जेव्हा सुटीला गावी यायचो तेव्हा वडिलांबरोबर अनेक वेळा कामावर जात होतो. मी स्वतःही अनेक वेळा वडिलांच्या हाताखाली बिगारी काम केले आहे, त्यामुळे वडिलांना किती कष्ट सोसावे लागतात याची जाणीव मला होत असे. आई व वडील यांच्या कष्टाची जाणीव ठेवूनच यापुढेही शिकणार आहे. मला पुढे जाऊन कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचे आहे. 

मुलीच्या शिक्षणासाठी माझी कष्ट करण्याची तयारी
महेशचे वडील रामचंद्र दुधे म्हणाले, मी करमाळा शहर व परिसरातील गावांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून गवंडी काम करतो. आपल्या वाट्याला जे कष्ट आले आहेत, ते मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मुलांच्या शिक्षणावर आम्ही भर देत आहोत. महेश सहावीपासून नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे शिकतो. तिथे त्याने खूप कष्टाने अभ्यास केला. कुठलीही तक्रार न करता तो सतत अभ्यास करत असतो. यापुढेदेखील मुलीच्या शिक्षणासाठी माझी कष्ट करण्याची तयारी आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

'Gautam Gambhir मला देशद्रोही म्हटलं अन् अपशब्दही वापरले... ', विश्वविजेत्या भारतीय खेळाडूचा खळबजनक आरोप

Civic Scam: पुणे महापालिकेतील बोगस भरती घोटाळा उघड: ३० लाखांच्या डीलचा व्हिडिओ समोर, शेकडो तरुणांची फसवणूक

Indapur Crime : तरंगवाडी येथे अनैतिक संबंधांच्या संशयातून लोखंडी रॉडने वार करून 54 वर्षीय व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Karad Silver-Cash Seizure: कऱ्हाडमध्ये ट्रॅव्हल्स वाहनातून १५० किलो चांदी व ४० लाखांची रोकड जप्त; पोलिस व आयकर विभागाची पडताळणी सुरू

SCROLL FOR NEXT