dafli aandolan.jpg 
सोलापूर

कोरोना उपासमारीच्या प्रश्‍नावर बार्शीत डफली वाजवून केले आंदोलन 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) ः कोरोना आजारामुळे सर्व प्रकारचे व्यवसाय व सेवा बंद झाल्याने हातावरचे पोट असणाऱ्या लोकांच्या उपासमारीचा प्रश्‍न मांडण्यासाठी डफली वाजवून आंदोलन करण्यात आले. 

मागील 25 मार्चपासून सार्वजनिक बससेवा बंद आहे. इतर वाहनाची वाहतूक देखील परवानगी शिवाय नाही. कार्यालये, बाजारपेठ, हॉटेल बंद ठेवून निर्बंध घालण्यात आले. हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांची उपासमार होत आहे. चार महिने होऊन गेले ही सेवा बंद असून त्या त्वरीत सुरु कराव्यात अशी मागणी करीत डफली वाजवून बार्शी शहर बसस्थानकासमोर बहुजन वंचित आघाडीने बुधवारी आंदोलन केले. 

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत सुधारणा करण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणाचे सूत्र ठरवले पाहिजे. 15 टक्के जनता उपचार घेत आहे. 80 टक्के जनतेवर बेरोजगार,उपासमारीची वेळ आली आहे.निर्बंध घातल्याचे दुष्परिणाम समोर आले असून 100 टक्के जनतेवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या सर्व घटनांचा आढावा घेऊन त्वरीत जिल्हाबंदी उठवावी, बससेवा सुरू करावी, उद्योग, व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. 

निवेदन नायब तहसीलदार संजीवन मुंढे व आभार व्यवस्थापक वाकडे यांना देण्यात आले. याप्रसंगी वंचितचे शहर अध्यक्ष धनंजय जगदाळे,तालुका अध्यक्ष समाधान भालशंकर, अर्जुन चव्हाण, वैभव पाटील, शोएब सय्यद, वसिम मुलाणी, संतोष कांबळे, बालाजी गोरे, स्वप्निल चौधरी, किशोर काकडे, स्वप्नील लंकेश्वर, किशोर ढोले, बाळासाहेब माने उपस्थित होते. 
 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसच्या डाऊनफॉलचं विधान, परिपक्वतेवरून आजोबा पवारांनी पार्थचे टोचले कान; काँग्रेसनं म्हटलं, कृतघ्न मुलगा

Pune News: डॉ. मुग्धा कर्णिक यांचा पुण्यातील आळंदी संस्थानकडून निषेध; श्री विठ्ठल आणि संतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य!

Washim News: पोहरादेवी यात्रा नंतर गायींना प्लास्टिकमुळे मृत्यू;स्थानिक गोपालकांचा नुकसानभरपाईसाठी ग्रामपंचायतकडे आग्रह

Hrishikesh Vaidya Case: भोंदूबाबा हृषीकेश वैद्यकडून तपासकामात असहकार्य; देवाचा अवतार असल्याची बतावणी, शेंडी न कापण्याचे आदेश!

Buldhana News: कोराडी धरणावरून आकाशात झेप घेणार सी-प्लेन; तांत्रिक सर्व्हेला झाली सुरूवात; विवेकानंद स्मारक आता येणार जगाच्या नकाशावर

SCROLL FOR NEXT