Corona Media Gallery
सोलापूर

शहर-जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरूच ! मंगळवारी 60 बळी; 2703 जणांना डिस्चार्ज

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना मृत्यूचे थैमान सुरूच आहे

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना (Covid-19) मृत्यूचे थैमान सुरूच आहे. ग्रामीण भागातील 49 आणि महापालिका हद्दीतील 11 अशा एकूण 60 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे मंगळवारच्या अहवालातून (Corona Report) स्पष्ट झाले. तर 2 हजार 703 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यातील 2 हजार 478 जण ग्रामीण भागातील तर 225 जण हे महापालिका हद्दीतील आहेत. (Corona deaths continue in Solapur city and district)

मंगळवारी 1 हजार 687 नव्या कोरोना बाधितांची भर जिल्ह्याच्या आकडेवारीत पडली आहे. त्यातील 1 हजार 547 रुग्ण ग्रामीण भागातील तर 140 रुग्ण महापालिका हद्दीतील आहेत. रुग्णालयात सध्या 16 हजार 986 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 15 हजार 610 रुग्ण ग्रामीण भागातील तर 1 हजार 376 रुग्ण हे महापालिका हद्दीतील आहेत.

माढ्यात दहा जण दगावले

ग्रामीण भागात आज कोरोनामुळे 49 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये माढा तालुक्‍यात सर्वाधिक 10, दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 8, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 7, मोहोळ व मंगळवेढा तालुक्‍यात प्रत्येकी 6, अक्कलकोट तालुक्‍यात 5, माळशिरस तालुक्‍यात 4, बार्शी तालुक्‍यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

माळशिरसमध्ये 361 नवे बाधित

आज ग्रामीण भागात 1 हजार 547 नव्या कोरोना बाधितांची भर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 361 रुग्ण हे माळशिरस तालुक्‍यातील आहेत. अक्कलकोट तालुक्‍यातील 44, बार्शी तालुक्‍यातील 184, करमाळा तालुक्‍यातील 224, माढा तालुक्‍यातील 192, मंगळवेढा तालुक्‍यातील 130, मोहोळ तालुक्‍यातील 98, उत्तर सोलापूर तालुक्‍यातील 34, पंढरपूर तालुक्‍यातील 212, सांगोला तालुक्‍यातील 12 आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील 56 नव्या रुग्णांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT