सोलापूर

आयुक्तांनी दिले; कोरोनामुळे रखडले 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : भांडवली निधीतून सुचविलेली कामे आयुक्तांनी रद्द केली. पदाधिकारी व नगरसेवकांच्या संतापानंतर अखेर मार्चअखेर कामे पूर्ण करण्यास त्यांनी "ग्रीन सिग्नल' दिला. मात्र, कोरोना विषाणू प्रादुर्भावाने तब्बल 15 कोटींची कामे खोळंबली आहेत. 

सर्वपक्षीयांनी दिला आंदोलनाचा इशारा 
भांडवली निधीतून सुचविण्यात आलेली पण वर्कऑर्डर न झालेली सुमारे 15 कोटींची कामे स्थगित करत महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नगरसेवकांना 27 फेब्रुवारी रोजी वर्षपूर्तीची भेट दिली. त्यांच्या निर्णयामुळे 2017-18 या कालावधीत सुचविण्यात आलेली व अभिप्राय दिलेली कामे आता थांबविण्यात आली. आयुक्तांच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वपक्षीय आंदोलनाचा निर्णय झाला. सत्ताधारी भाजपसह सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांनी आयुक्तांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. 

पदाधिकाऱ्यांसमवेत झाली बैठक
सर्वांच्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या उपस्थितीतील बैठकीत सर्वपक्षीय गटनेत्यांबरोबर चर्चा झाली. त्यानंतर आयुक्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गटनेते आनंद चंदनशिवे, रियाज खरादी, चेतन नरोटे उपस्थित होते. सुरू असलेली कामे रद्द करू नयेत, अशी मागणी सर्व गटनेत्यांनी केली. नगरविकास विभागाकडून विविध विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी वेळेत खर्च करण्याचे बंधन असते. त्यानुसार आदेश काढल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांच्या विरोधामुळे त्यांनी मार्चअखेर कामे पूर्ण करण्यास मंजुरी दिली.

मंजुरी मिळाली, पण...
त्यानुसार कामे सुरू करण्यात आली, मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावचे परिणाम दिसू लागल्याने अनेक कामांच्या निविदा मंजूर होऊनही कामगार नसल्याने कामे रखडली आहेत. काही नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांच्या निविदा अद्याप प्रसिद्ध व्हायच्या आहेत. त्यामुळे त्यांचा निधी परत जाणार आहे. परिणामी, ही कामे करण्यास जून 2020 पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी नगरसेविका सुनीता रोटे व वैष्णवी करगुळे यांनी केली आहे. 

शासनाने दिली मे पर्यंत मुदतवाढ 
शासनाने 2015-16, 2016-17 आणि 2017-18 या आर्थिक वर्षांतील विकासनिधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ 31 मे 2020 पर्यंत दिली आहे. हा निर्णय फक्त कार्यादेश देऊन सुरू झालेल्या पण पूर्ण न झालेल्या कामांसाठीच असणार आहे. त्यामुळे 2017-18 या आर्थिक वर्षात अभिप्राय दिलेले पण 27 फेब्रुवारी 2020 पर्यंत वर्कऑर्डर न दिलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे श्री. तावरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. सर्व खातेप्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT