0Tomato
0Tomato 
सोलापूर

लॉकडाउनमुळे टोमॅटोचा लाल चिखल 

सकाळ वृत्तसेवा

मळेगाव (सोलापूर) : कोरोनापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण देशभरात लॉकडाउन पुकारला आहे. संचारबंदी व विविध कलमे लागू केल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसमोर विक्रीसाठी आलेला टोमॅटो विकायचा कसा हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. मागणी व उठावाचा अभाव तसेच जमावबंदीमुळे व्यापारी, शेतमजूर यांनी पाठ फिरवल्याने बार्शी तालुक्‍यातील पिंपरी (सा.) येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी शशिकांत विश्‍वंभर काशीद यांच्या शेतात लाल चिखल तयार झाला आहे. 
सोन्यासारखा चमकणारा टोमॅटो डोळ्यासमोर खराब होत असल्याचे पाहून संपूर्ण कुटुंबच धास्तावले आहे. नांगरणी, ड्रीप, मल्चिंग पेपर पसरणी, रोप लागवड, औषध फवारणी, सुतळी, बांबू, तार आदींसाठी एक एकर टोमॅटो लागवडीसाठी दीड लाख रुपये इतका खर्च आला असून त्यातून मिळणारे उत्पन्न केवळ 15 हजार रुपये इतके मिळाले आहे. 
25 किलो वजनाच्या कॅरेटला केवळ 30 रुपये इतका भाव मिळत असल्याने उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ आली आहे. शेतात जागोजागी टोमॅटोचे ढीग साचले आहेत. अवकाळी पाऊस, वाढती उष्णता, संचारबंदी, मालाचे गडगडले दर, ग्राहकांनी व मजुरांनी फिरवलेली पाठ यामुळे 
शेतकरी मात्र कोरोनाच्या व निसर्गाच्या दुष्टचक्रात पुरता अडकला आहे. 
एक एकर टोमॅटो लागवडीसाठी दीड लाख रुपये इतका खर्च आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाउन पुकारला असल्यामुळे त्याचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. संचारबंदीमुळे माझे तीन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने टोमॅटो उत्पादक शेकऱ्यांना नुकसानभरपाई देत मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शशिकांत काशीद यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT