revinue loss 
सोलापूर

तिजोरीला "कोरोना'ची झळ : महसुलात 13 हजार कोटींची घट

तात्या लांडगे
सोलापूर : "कोरोना' विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून राज्य सरकारने सरकारी कार्यालये नाममात्र सुरू ठेवली आहेत. जमिनीसह सोने व अन्य वस्तू खरेदी-व्रिकीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील 15 दिवसांत राज्याच्या महसुलात तब्बल 13 हजार कोटींची घट झाली असून मार्चअखेरपर्यंत ती घट 24 हजार 640 कोटींपर्यंत जाईल, असे वित्त विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.


हेही नक्‍की वाचा : जनता कर्फ्यू ! विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच


यंदा (2019-20) महसुलातून तीन लाख 14 हजार 640 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले आहे. तर भांडवली व महसुली खर्चासाठी तीन लाख 70 हजार कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे. तरीही कोरोनामुळे राज्य सरकारच्या महसुली उत्पन्नाचे उद्दिष्टही पूर्ण होणार नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, अपेक्षित उत्पन्न व होणाऱ्या खर्चातून राज्य सरकारला मार्ग काढावा लागणार आहे. तसेच आगामी वर्षाच्या अंर्थसंकल्पातील नियोजित कामे अन्‌ त्यावरील खर्चाची तरतूद आणि यावर्षीच्या महसुली उत्पन्नात घट झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे. याबाबत वित्त विभागाकडून पुढील आठवड्यात आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार भांडवली कामांना कात्री लावण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


हेही नक्‍की वाचा : भाजप खासदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला


यंदा दोन लाख 90 हजार कोटींपर्यंत महसूल होईल जमा
राज्य सरकारने यंदा तीन लाख 14 हजार कोटींच्या महसुली उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान, कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पातळ्यांवर ठोस निर्णय घेतले आहेत. कोरोनामुळे व्यापार, उद्योगांसह अन्य क्षेत्रांवर परिणाम झाला असून मागील काही दिवसांत अपेक्षित महसूल जमा झालेला नाही. यंदा दोन लाख 90 हजार कोटींपर्यंत महसूल जमा होईल.
- राजीव मित्तल, सचिव, वित्त


हेही नक्‍की वाचा : कोरोना संशयीताचा रेल्वेने प्रवास ! उद्यान एक्‍स्प्रेसचा डबा केला सील


उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात 80 हजार कोटींचा बोजा
राज्य सरकारला यंदा महसुलातून तीन लाख 14 हजार कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. दुसरीकडे मार्च 2020 पर्यंत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शनसाठी एक लाख 10 हजार कोटींचा तर भांडवली कामांसाठी दोन लाख 60 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, मार्चअखेरपर्यंत दोन लाख 90 हजार कोटींपर्यंतच महसुली उत्पन्न मिळणार असल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर यंदा तब्बल 80 हजार कोटींचा बोजा पडणार असल्याने आगामी वर्षात भांडवली कामांना कात्री लावण्याचा विचार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT