balasaheb thakare
balasaheb thakare 
सोलापूर

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी नगरसेवक देणार मानधन...महापालिका कोणती वाचा 

तात्या लांडगे

सोलापूर : शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा या हेतूने शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत मानधन द्यावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी केले. महापालिका निवडणुकीपर्यंत तब्बल 60 लाखांचा निधी त्यातून उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने तीनवेळा निवीदा काढूनही मक्‍तेदारांनी निवीदाच भरली नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले. 


बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. 21) शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख वानकर, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अस्मिता गायकवाड, उपशहरप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, विठ्ठल कोटा, राजकुमार हंचाटे, भारतसिंह बडूरवाले, संजय देशमुख, विष्णू कारमपुरी आदी उपस्थित होते. दरम्यान, माजी सेना, माजी सेवा या टॅग लाइनखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राबविलेल्या सामाजिक उपक्रमांचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करावेत. जेणेकरून शिवभोजनासह अन्य उपक्रमांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचण्यास मदत होईल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आठ ते दहा कोटींचा निधी महापालिकेच्या माध्यमातून शासनाकडून मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत झाला, असे नगरसेवक धुत्तरगावकर यांनी सांगितले. 


स्मारकाच्या कामासाठी शंकर चौगुले यांची तयारी 
महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी सुमारे पाच कोटींच्या भांडवली निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आहे. स्मारकाच्या कामासाठी महापालिकेने तीनवेळा निविदा काढली परंतु, मक्‍तेदारांनी त्याकडे पाठ फिरवली. केलेल्या कामांची बिले महापालिकेकडून तीन-चार वर्षांनंतरही मिळत नसल्याने मक्‍तेदारांनी निविदाच भरली नाही. या पार्श्‍वभूमीवर शंकर चौगुले यांनी स्मारकाच्या कामाची तयारी दर्शविली. शिवसेनेच्या बैठकीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. 

काम करा अन्यथा पदाधिकाऱ्यांमध्ये बदल : बरडे 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असून आगामी काळात शिवसेनेचे संघटन मजबूत व्हावे, शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचाव्यात यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी काम करावे. जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी तालुकास्तरीय दौरा करून लोकांचे प्रश्‍न जाणून घेतील. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, मात्र काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिला. या पुढे शिवसेना पक्षप्रमुख हा एकमेव गट राहील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT